ETV Bharat / state

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलासमोर पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांसमोर तीन महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या पाचही जणांवर शासनाने 27 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

five naxals surrendere before gadchiroli police
गडचिरोली पोलीस दलासमोर पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
author img

By

Published : Dec 31, 2019, 9:38 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पोलिसांसमोर केलेले आत्मसमर्पण, वर्षभरात विविध चकमकींमध्ये माओवाद्यांचा झालेला खात्मा आणि बॅकफुटवर गेलेली नक्षल चळवळ, यामुळे आणखी पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांसमोर तीन महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या पाचही जणांवर शासनाने 27 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

गडचिरोली पोलीस दलासमोर पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

हेही वाचा... २०१९ मधील या घटनांनी देशाला हादरवले, टाकूया शेवटची नजर..

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये अजय उर्फ मनेसिंग फागूराम कुळयामी हा माओवादी एप्रिल २००७ला 'टिपागड दलम'मध्ये सदस्य पदावर भरती होऊन, जुलै २०१६ पासून ते आजपर्यत प्लॉट्न कमांक ३ मध्ये उपकमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १९ गुन्हे व खुनाचे १२ गुन्हे, जाळपोळीचे पाच गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर एकूण पाच लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी ही २६ वर्ष वयाची माओवादी असून, ती सन २००८ला टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. जुलै २०१५ पासून ते आजपर्यंत ती प्लॉट्न क.३ मध्ये सदस्यपदी कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे आठ गुन्हे, खुनाचे दोन गुन्हे तसेच जाळपोळीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने एकूण पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा... सलग चौथ्या महिन्यात पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात घसरण

सपना उर्फ रुसमा दोलू वड़े ही २७ वर्षांची जहाल माओवादी ऑक्टोबर २००६ मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती झाली होती. डिसेंबर २०११ पर्यंत धानोरा दलम मध्ये ती कार्यरत होती. त्यानंतर जानेवारी २०१२ पासून ती आजपर्यंत प्लाटून क. १५ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १२ गुन्हे , खुनाचे चार गुन्हे आणि जाळपोळीचे चार गुन्हे दाखल असून शासनाने तिच्यावर एकूण पाच लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा... 'ही' सुविधा न दिल्यास कंपन्यांना रोज द्यावा लागणार ५ हजारांचा दंड

गुन्नी उर्फ बेहरी उर्फ वसंती मनकेर मडावी (३१) माओवादी डिसेंबर २००७ला टिपागड दलमच्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिला सन २०१३ मध्ये टिपागड दलमच्या पीपीसीएम या पदावर पदोन्नती दिली गेली. त्यानंतर २०१५ पासून आजपर्यंत ती कंपनी कं.१० च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे दोन गुन्हे दाखल असून, शासनाने तिच्यावर एकूण पाच लाख ७५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा... खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

सुनिल उर्फ फूलसिंग सुजान होळी (३८) हा माओवादी जुलै २००८ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्या पदावर भरती झाला होता. फेब्रुवारी २०१३ पासून आजपर्यंत कंपनी क्र. १ च्या सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १२ गुन्हे, खुनाचे चार गुन्हे, जाळपोळीचे तीन गुन्हे आणि अपहरणाचे दोन गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर एकूण पाच लाख ७५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा... '...तर महाविकास आघाडीची माती झाल्याशिवाय राहणार नाही'

गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपूर्ण नक्षलविरोधी अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०१९ आणि सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये नक्षलवाद्यांवर वचक ठेवत कुठेही अनुचित प्रकार घडू न देता केलेली यशस्वी कामगिरी यामुळे माओवादयांचे मनोबल ढासळण्यास मदत मिळाली. सरत्या वर्षात एकूण १ कोटी ८० लाख रूपये बक्षीस असलेल्या ३४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात तीन डिव्हीसी, दोन दलम कमांडर, दोन दलम उपकमांडर, २६ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

हेही वाचा...नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत तगडा बंदोबस्त, महिला सुरक्षा आणि 'ड्रिंक अ‌ॅड ड्राईव्ह'वर नजर

इतिहासात पहिल्यांदाच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले आहे. तर सन २००५ पासून आजपर्यंत एकुण ६३८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर २२ माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये दोन डीकेएसझेडसी सदस्य, एक दलम कमांडर, चार सदस्य, दोन पार्टी मेंबर आणि तेरा समर्थक यांचा समावेश आहे. अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, मनीष कलवानिया उपस्थित होते.

Intro:नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलासमोर पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पोलिसांसमोर केलेले आत्मसमर्पण, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा आणि बॅकफुटवर गेलेली नक्षल चळवळ, यामुळे आणखी पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांसमोर तीन महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या पाचही जणांवर शासनाने 27 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.Body:आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये अजय उर्फ मनेसिंग फागूराम कुळयामी हा माओवादी एप्रिल २००७ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होवुन जुलै २०१६ पासून ते आजपर्यत प्लॉट्न कमांक ०३ मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे १९ गुन्हे व खुनाचे १२ गुन्हे, जाळपोळीचे ०५ गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याचेवर एकूण ०५ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी ही २६ वर्ष वयाची माओवादी असुन ती सन २००८ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन जुलै २०१५ पासून ते आजपर्यंत ती प्लॉट्न क.३ मध्ये सदस्यपदी कार्यरत होती. तिचेवर चकमकीचे ०८ गुन्हे, खुनाचा २ गुन्हे व जाळपोळीचे ०२ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने एकूण ०५ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

सपना उर्फ रुसमा दोलू वड़े ही वय २७ वर्ष वयाची जहाल माओवादी आक्टोबर २००६ मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती होवुन माहे डिसेंबर २०११ पर्यंत धानोरा दलम मध्ये कार्यरत होती. त्यानंतर जानेवारी २०१२ पासून ती आजपर्यंत प्लाटून क. १५ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १२ गुन्हे , खुनाचे ०४ गुन्हे , जाळपोळीचे ०४ गुन्हे दाखल असून शासनाने तिच्येवर एकुण ०५ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

गुन्नी उर्फ बेहरी उर्फ वसंती मनकेर मडावी ही वय ३१ वर्ष वयाची माओवादी डिसेंबर २००७ ला टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होवुन कार्यरत असतांना सन २०१३ मध्ये टिपागड दलमख्या पीपीसीएम या पदावर पदोन्नती दिली. त्यानंतर ती २०१५ पासून आजपर्यंत कंपनी कं.१० च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ०२ गुन्हे दाखल असून शासनाने तिचेवर एकूण ०५ लाख ७५ हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

सुनिल उर्फ फुलसिंग सुजान होळी वय ३८ वर्ष वयाची माओवादी जुलै २००८ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्या पदावर भरती होवून माहे फेब्रुवारी २०१३ पासून आजपर्यंत कंपनी क.१० च्या सदस्य पदावर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे १२ गुन्हे व खुनाचे ०४ गुन्हे, जाळपोळीचा ०३ गुन्हे, अपहरणाचे ०२ गुन्हे दाखल आहे. शासनाने त्याच्यावर एकूण ०५ लाख ७५ हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपुर्ण नक्षलविरोधी अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे त्याचबरोबर
सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०१९ आणि सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये नक्षलवाद्यांवर वचक ठेवत कुठेही अनुचित प्रकार घडु न देता केलेली यशस्वी कामगिरी यामुळे माओवादयांचे मनोबल ढासळण्यास मदत मिळाली. सरत्या वर्षात एकूण १ कोटी ८० लाख रूप्ये बक्षीस असलेल्या ३४ जहाल माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ०३ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०२ दलम
उपकमांडर, २६ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले आहे. तर सन २००५ पासून आजपर्यंत एकुण ६३८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर २२ माओवादयांना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये डी. के. एस. झेड. सी. मेंबर ०२, दलम कमांडर ०१, सदस्य ०४, पार्टी मेंबर ०२, समर्थक १३ यांचा समावेश आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, मनीष कलवानिया उपस्थित होते.
Conclusion:सोबत व्हिज्युअल व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.