ETV Bharat / state

एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : May 21, 2021, 9:12 PM IST

शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना बेड्या ठोकल्या. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात ही मोहीम राबविण्यात आली.

१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर - शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या आहेत. यावेळी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करी त पाच तस्करांना बेड्या ठोकल्या. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात ही मोहीम राबविण्यात आली.

पोलिसांकडून वाहन, दारूसाठा जप्त

शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ३४ एम ९९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी शक्ती संजू शाह (वय ३७, रा. बायपास रोड), लक्ष्मीनारायण पुतान परसराम (वय ३५, रा. अष्टभुजा वॉर्ड), रवींद्र विजय गुजर (वय ३०, रा. अष्टभुजा वॉर्ड) हे तिघे वाहनात होते. वाहनातून विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा असा सुमारे 10 लाख 3 हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध दारूतस्करांचे दणाणले धाबे

रेल्वेस्थानक चौकात दुसरी कारवाई करीत साजिद इसाक कुरेशी (वय ३१, रा. शास्त्रीनगर, वणी) याला अटक केली. हा एमएच २९ एम ५९६७ क्रमांकाच्या ऑटोने दारूची तस्करी करीत होता. यावेळी दीड लाख रुपये किमतीची देशी दारू, बिअर असा सुमारे 2 लाख 4 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जनता कॉलेज चौकात तिसरी कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ३४ बीबी १४७२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दारूतस्करी केली जात होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत एक लाख रुपये किमतींची देशी दारू आणि वाहन असा सहा लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चालक ईश्वर रमेश वाघमारे (वय २६, रा. हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने अवैध दारूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - बार्ज पी-305 : नातेवाईकांच्या नाराजीनंतर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण, २३ जणांची ओळख पटली

हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.