ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत आर्थिक घोळ, अंदाजे 60 लाख रुपयांची अफरातफर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. अशाच प्रकारचा घोळ शहरात नावारुपास आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेतील मुख्य लिपीक व माजी व्यवस्थापक यांनी संस्थेतील संगणकाव्दारे झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अंदाजे साठ लाख रुपयाचा आर्थिक घोळ करत अफरातफर झाल्याची तक्रार संस्थेचे मानद सचिव उमेश कुंभारे यांनी चिमूर पोलीसात दाखल केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत आर्थिक घोळ
राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत आर्थिक घोळ
author img

By

Published : Feb 16, 2021, 9:24 PM IST

चंद्रपूर (चिमूर) - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. अशाच प्रकारचा घोळ शहरात नावारुपास आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेतील मुख्य लिपीक व माजी व्यवस्थापक यांनी संस्थेतील संगणकाव्दारे अफरातफर झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अंदाजे साठ लाख रुपयाचा आर्थिक घोळ करत अफरातफर झाल्याची तक्रार संस्थेचे मानद सचिव उमेश कुंभारे यांनी चिमूर पोलीसात दाखल केली आहे. त्यामुळे संस्थेचे ठेवीदार व ग्राहक यांच्यात पत संस्थेविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेमध्ये अमोल अरुण मेहरकुरे हे मुख्य लिपीक पदावर 2016 पासुन कर्तव्यावर आहे. मारोती वाल्मीक पेन्दोर हे 31 ऑगस्ट 2020 पर्यंत माजी व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या सही शिवाय कोणतेही आर्थिक व्यव्हार होत नव्हते. मात्र सदर कालावधीत संस्थेची दीड लाख रुपयांच्या रक्कमेसह आमद लाभांश रक्कम कार्यालय भाडे सहपत्रानुसार नमुद केलेल्या व्यक्तीच्या चालु खात्यात परस्पर रक्कम दोन्ही व्यक्तींनी वळती केल्या आहेत. त्यांच्या खात्याला रक्कम जमा असल्याचे व अफरातफर केल्याचे 12 फेब्रुवारीला चिमूर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मित्रांच्या खात्यात संस्थेची रक्कम वळती
संस्थेतील संगणकाव्दारे अंदाजे साठ लाख रुपयांची रक्कम अफरातफर करून वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करून आर्थिक घोळ केला आहे. परंतु त्या रकमेची नोंद दैनिक रोजनीशी बुकमध्ये नाही. मुख्य लिपीक अमोल मेहरकुरे यांचे वडील याच संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या व परिवारातील काही सदस्य व मित्रांच्या खात्यात संस्थेची रक्कम वळती केली आहे. या संस्थेचे लिपीक व माजी व्यवस्थापक यांनी संगनमताने संस्थेत आर्थिक घोळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हा घोळ साठ लाख रुपये आहे की यापेक्षा जास्त रकमेचा आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या आर्थिक अफरातफरीत पुन्हा काही संचालक गुंतले असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. या संदर्भात चिमूरचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांचेशी संपर्क साधला असता प्रकरण चौकशीत असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - दीराला खांद्यावर बसवून गर्भवती महिलेला करायला लावली ३ किमीची पायपीट, बॅटने केली मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.