चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या नारंडा येथील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रशासनाने केले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यात नुकसानभरपाई मंजूर यादीत शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याने बळीराजा संतापला. नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, ही मागणी करत नारंडा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईची मंजूर यादी प्रसिद्ध केली. मंजूर झालेल्या यादीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नव्हते. या प्रकाराने बळीराजा संतापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
कोरपणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नारंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल शेंडे, दिपक मोहूर्ले, गजानन भोंगळे, सत्यवान चामाटे,यांसह बहुसंख्येने शेतकरी या धडक मोर्चात सहभागी झाले होते.
हेही वाचा - कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या