ETV Bharat / state

चंद्रपुरात तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - farmer suicide news

तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. किसन सानप, असे शेतकऱ्याचे नाव असून ते शेणगाव येथील रहिवासी आहेत.

farmer
किसन सानप
author img

By

Published : Dec 12, 2019, 7:30 PM IST

Updated : Dec 12, 2019, 7:40 PM IST

चंद्रपूर - तहसीलदारांसमोरच शेतकऱ्यांने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. किसन सानप, असे शेतकऱ्याचे नाव असून ते शेणगाव येथील रहिवासी आहेत. तहसीलदारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा - कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणून राष्ट्रवादी पक्ष निवडला - अनिल गोटे

किसन सानप यांच्या जमिनीच्या वादाचे प्रकरण जिवती तहसीलमध्ये प्रलंबित आहे. या प्रकरणात तहसीलदार बेडसे हे गैर अर्जदाराची बाजू घेतात, असा आक्षेप सानप यांचा आहे. सानप यांनी सांगितल्यानुसार, तहसीलदार बेडवे हे वारंवार तारखेवर बोलावून पिळवणूक करायचे. कार्यालय संपेपर्यंत बसवून ठेवायचे. जामिनासाठी पैशांची मागणी तहसीलदार करायचे, असा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे. तहसीलदारांच्या जाचाला कंटाळून अखेर सानप यांनी तहसीलदार बेडसे यांच्यासमोरच कार्यालयात विष घेतले. दरम्यान, सानप यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Intro:धक्कादायक...! तहसीलदाराच्या दालनात शेतकऱ्याची विषप्राशने आत्महत्येचा प्रयत्न.

चंद्रपूर

तहसीलदारासमोरच शेतकऱ्यांने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालूक्यात घडली आहे.कीसन सानप असे शेतकऱ्याचे नाव असून तो शेणगाव येथील रहिवासी आहे.
तहसीलदाराचा जाचाला कंटाळून शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याची माहीती आहे.

जिवती तालूक्यातील शेणगाव येथिल रहीवासी किसन सानप यांच्या जमिनीचा वादाचे प्रकरण जिवती तहसिल मध्ये प्रलंबित आहे. या प्रकरणात तहसिलदार बेडसे हे गैर अर्जदाराची बाजू घेतात असा आक्षेप सानप यांच्या आहे.सानप यांच्या म्हणण्यानूसार तहसिलदार बेडवे हे वारंवार तारखेवर बोलावून धाकधपट करायचे. कार्यालय सूटे पर्यंत बसवून ठेवायचे. जमानतीसाठी पैश्याची मागणी तहसिलदार करायचे असा गंभिर आरोप शेतकऱ्याने केला आहे. तहसिलदाराचा जाचाला कंटाळून अखेर सानप यांनी तहसिलदार बेडसे यांच्या समोरच कार्यालयात विष प्राशन केले. दरम्यान सानप यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.Body:विडीओConclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 7:40 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.