ETV Bharat / state

'निवडक कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कीटकनाशकांवर बंदी, सरकारच्या भूमिकेला विरोध' - कीटकनाशक बंदी प्रकरण चंद्रपूर

कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होत नाही. उलट ही कीटकनाशके शेतकऱ्यांना परवडणारी आहेत. याचा चांगला परिणाम उत्पादनावर होत आहे. 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचे धोरण करून केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या निवड स्वातंत्र्यावर गदा आणू पहात आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या या धोरणाचा विरोध करणार असल्याचे वामनराव चटप यांनी सांगितले.

Chandrapur
वामनराव चटप
author img

By

Published : May 29, 2020, 7:09 PM IST

चंद्रपूर - केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्याच्या मानसीकतेत आहे. अशा कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होत नाही. उलट ही कीटकनाशके शेतकऱ्यांना परवडणारी आहेत. याचा चांगला परिणाम उत्पादनावर होत आहे. असे असतानाही केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काही निवडक कंपन्यांना प्रस्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्यात येतो. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या या धोरणाचा विरोध करणार, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटप यांनी दिली.

शेतकऱ्याला निवड करण्याचा हक्क असला पाहिजे. तो कुठले कीटकनाशक निवडतो, हे त्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, अशा 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचे धोरण करून केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या निवड स्वातंत्र्यावर गदा आणू पाहात आहे. ज्यावर बंदीचा विचार सुरू आहे, त्यातील प्रत्येक कीटकनाशक हे शेतकऱ्यांना परवडणारे आहे. त्यांना भरघोस उत्पन्न देणारे आहे. या सर्व कीटकनाशकांवर संशोधन झाले आहे. ते कुठल्याही पद्धतीने नुकसानकारक नसल्यानेच त्याला मान्यता दिली आहे. एखादे कीटकनाशक सातत्याच्या वापराने प्रभावी ठरले नाही, तर शेतकरी दुसरे वापरतो आणि त्याचा परिणामही दिसून येतो. मात्र, शेतकऱ्यांचे हे स्वातंत्र्य हिरावण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

शेतकरी मागील 50 वर्षांपासून कीटकनाशके वापरत आहेत. कुठले चांगले याचा त्यांना चांगला अनुभव आहे. मात्र, काही कंपन्यांना काही निवडक कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हे केले जात आहे, असा आरोप अ‌ॅड. चटप यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या भूमिकेचा आपण विरोध करणार असल्याचे चटप म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.