चंद्रपूर - डोक्यावर कर्जाचे ओझे, त्यात सततची नापिकी आणि कर्जाच्या विंवचनेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या कढोली येथे ही घटना घडली. बाळा नानाजी धोटे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - अपंग विद्यार्थ्यापुढे संकटही नतमस्तक, दहावीची परीक्षा तर फक्त निमित्तमात्र
बाळा धोटे यांना दहा एकर कोरडवाहू जमीन आहे. धोटे यांच्यावर दोन लाखांचे बँकेचे कर्ज आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि सततच्या नापिकीने ते पुरते खचले होते. अखेर घराजवळील गोठ्यात गळफास घेऊन धोटे यांनी जीवन संपविले.