ETV Bharat / state

Eid Milan Controversy : काँग्रेसमध्ये कोल्डवॉर; ईदमिलनमध्ये पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होईना, निमंत्रणपत्रिकेत एकमेकांची नावे वगळली - ईदमिलन

ईदमिलन म्हणजे बंधूभावाचा सण असतो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शत्रू देखील गळाभेट घेऊन सदिच्छा देतात. मात्र काँग्रेसच्या ईदमिलन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होताना दिसत नाही आहे. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी तिवारी यांचे जाणीवपूर्वक नाव वगळले असल्याची चर्चा आहे.

Ramu Tiwari and Sohail Sheikh
रामू तिवारी आणि सोहेल शेख
author img

By

Published : May 9, 2023, 7:48 PM IST

Updated : May 9, 2023, 9:10 PM IST

चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात उफाळून आलेल्या वादाची शाई वाळते न वाळते तोच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसद्वारा ईदमिलननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रामू तिवारी आणि अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांचे काही केल्या मनोमिलन होताना दिसत नाही आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आपापल्या आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकमेकांची नावे वगळली आहेत.

काँग्रेसच्या अंतर्गत वादांची परंपरा: कुठलाही राजकिय पक्ष किंवा संघटना ही वादातीत नसते. प्रत्येक राजकीय पक्ष, संघटनेमध्ये वाद हा असतो. त्यामुळे हेवेदावे महत्वाकांक्षा, कुरघोडी, डावपेच ह्या सगळ्या गोष्टी यात आल्या. मात्र, त्याचे जाहीर प्रकटीकरण केल्यास प्रतिस्पर्ध्याला त्याचा लाभ होतो. तसेच संघटनही कमजोर होते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पक्षाअंतर्गतच ठेवल्या जातात. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष समजला जाणाऱ्या भारतीय जनता पक्ष देखीव याला अपवाद नाही. मुनगंटीवार आणि अहिर यांच्यातील टोकाचे मतभेद हे सर्वश्रुत आहेत.

राजकीय चर्चा सुरू: भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील कमालीचे वाद आहेत. मात्र, यावर हे नेते कधीही जाहीर भाष्य करीत नाहीत. मात्र काँग्रेस याला अपवाद आहे. येथील नेते पक्षाची प्रतिष्ठा दावणीला बांधत हमरीतुमरीवर येतात. एकमेकांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतात. पुर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलीया आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात आलेले कमालीचे वितुष्ट हे सर्वश्रुत होते. वडेट्टीवारांची काँग्रेस आणि पुगलीया यांची काँग्रेस अशी स्पष्ट विभागणी जिल्ह्याच्या राजकारणात होती. याच राजकीय वैमानस्याचे पुढचे पाऊल हे खासदार बाळू धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात आलेले वितुष्ट होते का? यावर देखील राजकीय चर्चा होऊ लागली आहे.

काँग्रेसच वरचढ ठरली: यापूर्वी त्यांच्यातली धुसफूस अधूनमधून दिसून येत होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचा भडका उडाला. वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट अशी विभागणी झाली. धानोरकरांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरोरा, भद्रावतीत देखील धानोरकरांच्या पॅनलला एकहाती सत्ता मिळु शकली नसली तरी, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काँग्रेसच वरचढ ठरली. मात्र वादाचे कारण ठरले ते चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती. येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हातमिळवणी करीत पॅनल लढवले आणि जिंकून देखील आले. तर विरोधी पॅनलचे नेतृत्व हे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडून याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे करीत होते.

वडेट्टीवारांविरोधात तोफ डागली: या विजयाचा जल्लोष करण्यासाठी खुद्द देवतळे आणि भोंगळे तिथे पोचले. गुलाल उधळत त्यांनी मिळून डान्स केला. यादरम्यान वडेट्टीवार गटाकडून देखील धानोरकरांविषयी भाष्य करण्यात आले, धानोरकरांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर थेट वडेट्टीवारांविरोधात तोफ डागली. धानोरकरांनी आपण वडेट्टीवारांच्या विधानसभा मतदार क्षेत्रात आमदारकीची निवडणूक लढतो आणि आपण माझ्या जागी खासदारकीची निवडणूक लढवून दाखविण्याचे आव्हान दिले. तसेच वडेट्टीवार पालकमंत्री झाल्यापासून कुठल्या काँग्रेस कार्यकर्त्याचे कुठले काम केले हे सांगण्याचेही थेट आव्हान दिले. धानोरकरांच्या नाराजीनाट्यानंतर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. भाजप सोबत हातमिळवणी करण्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

ईदमिलन कार्यक्रमाचे भव्य आयोजन: या मोठ्या नेत्यांच्या वादानंतर आता पदाधिकाऱ्यांत देखील धुसफूस दिसून आली. 28 एप्रिलला चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी ईदमिलन कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते. याच्या निमंत्रणपत्रिकेत खासदार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले या ठळक नेत्यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून नावे टाकली. त्यामुळे अल्पसंख्यांक विभागाचे सोहेल शेख यांचे नाव टाकण्याचा प्रश्नच येत नव्हता. पक्षाचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाच्या नेतृत्वात 9 मेला ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अंतर्गत वादाच्या चर्चेला बळ: विशेष म्हणजे येथे प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीपासून तर पक्षात नसलेले प्रवीण खोब्रागडे यांचे नाव टाकले, त्याही पुढे जाऊन माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांचे सुद्धा नाव टाकण्यात आले. तब्बल 24 मान्यवरांचे यात नाव आहे. मात्र चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांचे नाव यात वगळण्यात आले. विशेष म्हणजे देवतळे यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद गेल्यानंतर त्यांचा पदभार देखील तिवारी यांना देण्यात आला. असे असतानाही तिवारी यांचे नाव वगळण्यात आल्याने अंतर्गत वादाच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. ईदमिलन म्हणजे बंधूभावाचा सण असतो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शत्रू देखील गळाभेट घेऊन सदिच्छा देतात. मात्र काँग्रेसच्या ईदमिलन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होताना दिसत नाही आहे. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी तिवारी यांचे जाणीवपूर्वक नाव वगळले असल्याची चर्चा आहे. आता हे वितुष्ट आणखी समोर जाऊन वाढते की, त्यांच्यात मनोमिलन होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

सिंदेवाहीला लवकरच कृषी वन महाविद्यालय विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

Tajbagh Trust Embezzlement Case ताजबाग ट्रस्ट घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेनला अटक दीड कोटींचा घोटाळ्याचा आरोप

Owaisi Criticized PM नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत चित्रपटाचे प्रमोटर नाहीत ओवैसींची द केरला स्टोरी चित्रपटावरून टीका

Last Updated : May 9, 2023, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.