ETV Bharat / state

क्रूरतेचा कळस; कुत्र्याला भोकसले तलवारीने, "प्यार फाउंडेशन"ने वाचवले प्राण - An animal friendly organization "Pyaar Foundation" in Chandrapur

उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांआधी काही समाज विघातक व्यक्तींनी कुत्र्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवारीने वार केले. चंद्रपूरच्या "प्यार फाउंडेशन" नामक प्राणीमित्र संस्था सदस्यांनी गोरखपूरला जाऊन जीव धोक्यात असलेल्या जखमी कुत्र्याचे प्राण वाचवले आहेत.

कुत्र्याला भोकसले तलवारीने
कुत्र्याला भोकसले तलवारीने
author img

By

Published : Jun 22, 2021, 1:16 PM IST

चंद्रपूर - भटक्या जनावरांवर अनेकदा क्रूरता दाखवली जाते. याचा कळस म्हणजे एका भटक्या कुत्र्याला थेट तलवारीने भोसकण्यात आले. हा हल्ला इतका क्रूर होता की, तलवार थेट आरपार निघाली. अशाच अवस्थेत हा कुत्रा आपल्या अखेरच्या घटका मोजत आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील आहे. ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राण्यांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या चंद्रपुरातील 'प्यार फाउंडेशन' पर्यंत पोचली. या प्राण्याचे प्राण वाचविण्यासाठी मिशन गोरखपूर राबविण्यात आले. फाउंडेशनच्या सदस्यांनी थेट यूपी गाठली आणि कुत्र्याला वाचविले.

"प्यार फाउंडेशन"ने वाचवले कुत्र्याचे प्राण

चंद्रपुरातील पहिलीच संस्था

प्यार फाउंडेशन ही प्राण्यांच्या हक्कांविषयी काम करणारी चंद्रपुरातील स्वयंसेवी संस्था आहे. अशाप्रकारे इतक्या व्यापक स्वरूपात काम करणारी ही चंद्रपुरातील पहिलीच संस्था आहे. यापूर्वी अशा अनेक प्रकरणात प्राण्यांवर केलेल्या क्रूर अत्याचाराबाबत या संस्थेने आवाज उठवला होता. मात्र आता या संस्थेने हे मदतकार्य थेट उत्तरप्रदेशपर्यंत पोचवले आहे.

प्यार फाउंडेशनच्या चमुचे सर्वत्र कौतुक

उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जाऊन चंद्रपूरच्या "प्यार फाउंडेशन" नामक प्राणीमित्र संस्था सदस्यांनी जीव धोक्यात असलेल्या एका जखमी कुत्र्याचे प्राण वाचवले आहे. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर वायरल झाली होती. 10 ते 12 दिवसांआधी काही समाज विघातक व्यक्तींनी या कुत्र्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवारीने वार केले. हा वार इतका घातक होता की, तलवार थेट आरपार झाली. याच जखमी अवस्थेत हा कुत्रा फिरत होता, अखेरच्या घटका मोजत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे या कुत्र्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नव्हता. शहरातील प्राणी मित्रांनी याबाबत व्हाट्सप अभियान चालविले होते. कुणीही या कुत्र्याचे जीव वाचविण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहून प्यार फाउंडेशनच्या कुणाल महल्ले व अर्पित सिंग ठाकूर या 2 कार्यकर्त्यांनी विमानाने जाऊन उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील पेंड्रोना शहर गाठले. स्थानिक पोलीस आणि महानगर प्रशासनाने त्यांना संपूर्ण सहकार्य केले. प्यार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पेंड्रोना येथे जाऊन मोठ्या मुश्किलीने या कुत्र्याला पकडले. त्याचे नाजूक ऑपरेशन देखील केले गेले. सध्या सुखरूप स्थितीत असलेल्या या कुत्र्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला आणले जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर ते उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या पेंड्रोना गाठत एका जखमी कुत्र्याचे प्राण वाचवणाऱ्या प्यार फाउंडेशनच्या चमुचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - वणी परिसरातील चुनखडकात सापडले दुर्मिळ जीवाश्म

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.