ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळचा मृत्यू, चिमूर-वरोरा महामार्गावरील घटना - chimur warora highway incident

उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राणी पाण्याच्या शोधत भटकंती करत असतात, अशीच भटकंती करत असताना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याची सुमारास चिमूर ते वरोरा हायवेवरून रस्ता पार करताना मुरपार फाट्याजवळ पाण्याच्या व्हॉल्व्हजवळ अज्ञात वाहनाने चितळला जोरदार धडक मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Dead deer
मृत चितळ
author img

By

Published : May 29, 2020, 7:54 PM IST

चंद्रपूर - चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालगत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफ्फर झोन लागत असलेल्या खडसंगीपासून दीड किमी अंतरावरील मुरपार फाट्याजवळ अनेक जंगली प्राणी ताडोबा बफ्फर क्षेत्र ते मुरपार प्रादेशिक क्षेत्रात ये-जा करत असतात. त्यामुळे या जंगल परिक्षेत्रात वाघ, बिबट्या, चितळ, हरिण, अस्वल, डुक्कर यासारख्या अनेक प्राण्यांचा नेहमी वावर असतो, त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जंगलातील ठिकठिकाणी असलेले पाणवठे कोरडे पडले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राणी पाण्याच्या शोधत भटकंती करत असतात, अशीच भटकंती करत असताना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याची सुमारास चिमूर ते वरोरा हायवेवरून रस्ता पार करताना मुरपार फाट्याजवळ पाण्याच्या व्हॉल्व्ह जवळ अज्ञात वाहनाने चितळला जोरदार धडक मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे खडसंगी बिटचे वनरक्षक एन. डी. मडावी, वनरक्षक सी. एस. चिंचोळकर यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी बी. पी. चिवंडे यांच्या नेतृत्वात घटनास्थळी जाऊन पंचनामा करून हे मृत चितळ खडसंगी येथील विश्रामगृहात आणले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून मृत चितळला अग्नी देऊन जाळण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.