ETV Bharat / state

अबब....! मृत लाईनमॅनच्या वृध्द पत्नीला तब्बल दोनदा आले लाखांचे विद्युत बिल - mseb gondpimpri

गोंडपिपरीत दिवंगत लाईनमॅनच्या वयोवृद्ध पत्नीला एका महिन्याचे बिल सव्वादोन लाखाहून अधिक आले आहे. एवढेच काय त्यांचे दुसरही बिल तेवढच आले आहे.

chandrapur
कौशल्याबाई
author img

By

Published : Dec 5, 2019, 11:54 AM IST

Updated : Dec 18, 2019, 10:44 AM IST

चंद्रपूर- गोंडपिंपरीत दिवंगत लाईनमॅनच्या वयोवृद्ध पत्नीला एका महिन्याचे बिल सव्वादोन लाखाहून अधिक आले आहे. एवढेच काय त्यांचे दुसरेही बिल तेवढच आले आहे. वीज वितरण विभागाच्या या सावळ्या गोंधळाने त्रस्त झालेल्या वयोवृद्ध महिलेन बिल तर कमी करून आणले. मात्र, पुन्हा वीज विभागाकडून झटक्यावर झटके सुरूच राहिले. त्यामुळे तिने बिल न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विभागाने लाईन कापली. आता ती आपल्या परिवारासह अंधरात जीवन कंठीत आहे.

गोंडपिंपरीच्या धाबा मार्गावर कौशल्याबाई खटुजी उईके या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती खटूजी उईके हे विद्युत विभागात लाईनमॅन होते. अनेक वर्ष त्यांनी विभागात सेवा दिली. त्याचवेळी त्यांनी येथील बाबूराव झाडे यांच्याकडून घर विकत घेतले. काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर अतिशय काटकसर करून कौशल्याबाई आपल्या संसाराच गाडा चालवित आहेत. अशात गेल्या चार महिन्यापासून महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने त्या प्रचंड हैराण झाल्या आहेत. नेहमी पाच-सहाशे येणारे विद्युत बिल हाती पडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बिल होते सव्वादोन लाखाहून अधिक. विद्युत कंपनीच्या कार्यालयात अनेकदा खस्ता खात त्यांनी बिल कमी केले. पण दुसऱ्या महिन्यातही तसेच झाले. यावेळी बिल आले ते २ लाख २३ हजार ७९० इतके.

धाकधुकीचे वातावरण आणि प्रचंड संतापाखेरीज कौशल्याबाईंकडे पर्यायच उरला नाही. पुन्हा विद्यृत कार्यालयात जाऊन त्यांनी आपले वीज बिल कमी केले. संतापून पुन्हा असे न होण्याची ताकितही दिली. पुढच्या महिन्यात समाधानकारक बिल आले आणि आता असे काही होणार नाही, असे त्यांना वाटले. पण यानंतरही कौशल्याबाई यांना महिन्याचे दहा हजार तर कधी सात हजार असे बिल यायला लागले. अंधारात राहू पण हा वैताग नको, असे ठरवित त्यांनी बिल न भरण्याचा निर्णय घेतला. शेवटी विद्युत कंपनीने त्यांची लाईन कापली. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कौशल्याबाईचे परिवार अंधारात आहे. आता मात्र त्या कंटाळल्या असून आपल्या नातवांच्या सुरक्षितेसाठी पुन्हा एकदा विद्युत मिटर मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. विद्युत कंपनीत वर्षानुवर्ष सेवा देणाऱ्या लाईनमॅनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना झटका देणाऱ्या कंपनीच्या कारभाराबाबत आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ अटक

Intro:अबब....! मृत लाईनमॕनचा वृध्द पत्नीला तब्बल दोनदा लाखांचे विद्युत बिल;चंद्रपूर जिल्ह्यातील गोंपिपरीतील प्रकार

चंद्रपूर

तीन चार खोल्याच लहानस घर......दोन तिन लाईट अनं घरी लहानसी टिव्ही...अशा घरच महिन्याच लाईट बिल किती याव ....
चारशे पाचशे किंवा जास्तीत जास्त सातआठशे रूपये....पण गोंडपिपरीत दिवंगत लाईनमॅनच्या वयोवृध्द पत्नीला एका महिन्याच बिल सव्वादोन लाखाहून अधिक आहे.एवढेच कि काय दुसरही बिल तेवढच आल....परेशान झालेल्या वयोवृध्द महिलेन बिल तर कमी करून आणल पण पुन्हा विभागाकडून झटक्यावर झटके सुरूच राहिले अनं मग तिन बिलच न भरण्याचा निर्णय घेतला.विभागाने लाईन कापली.आता ती आपल्या परिवारासह अंधकारात जिवन कंठीत आहे.
एकीकळे निसर्गाच्या चक्रव्युहाने बळीराजा परेशान आहे.तर दुसरीकडे प्रशासनाच्या असंवेदनशिलतेन सामान्य जनता हैराण होत आहे.गोंडपिपरीच्या धाबा मार्गावर कौशल्याबाई खटुजी उईके या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत.त्यांचे पती खटूजी उईके हे विद्युत विभागात लाईनमॅन होते.अनेक वर्ष त्यांनी विभागात सेवा दिली.त्याचवेळी त्यांनी येथील बाबुराव झाडे यांच्याकडून घर विकत घेतलं.काही वर्षापुर्वी त्यांचे निधन झाले.पतीचे निधन झाल्यानंतर अतिशय काटकसर करून कौशल्याबाई आपल्या संसाराच रहाटगाडग चालवित आहेत.अशात गेल्या चार महिन्यापासून महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारान त्या प्रचंड हैराण झाल्या आहेत.नेहमी पाचसहाशे येणार विद्यूत बिल हाती पडल तेव्हा त्यांना धक्का बसला बिल होत सव्वादोन लाखाहून अधिक.विद्युत कंपनीच्या कार्यालयात अनेकदा खस्ता खात त्यांनी बिल कमी केल.पण दुस-या महिन्यातही तसच झाल.यावेळी बिल आल ते दोन लाख तेवीस हजार सातशे नव्वद.धाकधुकीच वातावरण अनं प्रचंड संतापाखेरीज कौशल्याबाईकडे पर्यायच उरला नाही.याही वेळी कार्यालयात जाउन त्यांनी बिल कमी केल.संतापून पुन्हा अस न होण्याची ताकीतही दिली.पुढच्या महिन्यात समाधानकारक बिल आल अन आता अस काही होणार नाही अस त्यांना वाटल.पण यांनंतर सतत कधी महिन्याच दहा हजार तर कधी सात हजार अस बिल यायला लागल.अंधारात राहू पण हा वैताग नको हा असे ठरवित त्यांनी बिल न भरण्याचा निर्णय घेतला.शेवटी विद्युत कंपनीने त्यांची लाईन कापलीच.गेल्या आठ ते दहा दिवसापासून कौशल्याबाईच परिवार अंधारात आहे.आता मात्र त्या कंटाळल्या असून आपल्या नातवांच्या सुरक्षितेसाठी पुन्हा एकदा विद्युत मिटर मिळविण्यासाठी अर्ज केला आहे.
विद्युत कंपनीत वर्षानुवर्ष सेवा देणा-या लाईनमॅनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुबियांना झटका देणा-या कंपनीच्या कारभाराबाबत आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.Body:विडीओ बाईट
Conclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.