चिमूर - चिमूर शहरातील ग्रामदेवता तथा पंचक्रोशीत प्रसिद्ध अशा श्रीहरी बालाजी देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळातील दोन विश्वस्तांची निवड करण्यात आली. यात ॲड.नवयुवक कामडी तथा धरमसिह वर्मा यांची निवड करण्यात आली. मात्र ज्यांच्या जागेत मूर्ती प्राप्त झाली व मंदिर निर्मिती करण्यात आली अशा भिकाजी पाटील डाहुले यांचे वंशजानांच श्रीहरी बालाजी देवस्थान विस्वस्त मंडळातून बेदखल करण्यात आले आहे. विश्वस्तातील ही निवड फेटाळण्याची मागणी डाहुले परिवारा तर्फे करण्यात येत आहे .
हेही वाचा - अँटिलिया प्रकरणी यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज
बालाजी मंदिरात डाहुलेंचा मान :
चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजीची प्रतिमा जमिनदार भिकाजी पाटील डाहुले यांचे गोठ्याच्या पायवाच्या खोदकामात मिळाल्याचा इतिहास सांगण्यात येतो.भिकाजी पाटील डाहुले यांनी मंदिराचे निर्मितीसाठी मंदिर परिसरातील जमीन दान करण्यात आली. डाहुले परिवारांचे कुलदैवत श्रीहरी बालाजीच आहेत. गोकुळ अष्टमीला गाभार्यात जाऊन श्रीहरीची पूजा तथा विशेष अभिषेक करण्याचा तथा घोडारथ परिक्रमेवेळेस पूजा तथा नैवद्य देण्याचा मान डाहुले कुटूंबाला आहे. कुटूंबातील व्यक्ती मरण पावल्यास त्यांचे अस्थी विसर्जन मंदिरापुढील तलावात होते. तसेच देवळात नित्यनेमाने डाहुले कुटुंबातील महिला देवासमोर सडासंमार्जन व सायंकाळी देवळात दिवे नेतात .
विश्वस्त मंडळातील निवडीवर आक्षेप :
श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुरेश डाहुले तथा बबनराव बोथले यांचे निधन झाले. त्यामूळे विश्वस्ताचे दोन पदे रिक्त झाले. या रिक्त पदा पैकी एकावर भिकाजी पाटील डाहुले यांचे वंशजाना असणारा हा मान तथा महत्व लक्षात घेता देवस्थान विश्वस्त मंडळात निवड करणे अपेक्षित होते. त्याकरीता कुटूंबातील सात सदस्यांनी अर्ज केला. मात्र, २३ मार्चला परप्रांतीय असलेले आणि दारूच्या व्यावसायाकरीता चिमूरला आलेल्या धरमसिंह वर्मा तथा देवस्थानशी कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबध नसलेल्या अँड.नवयुवक कामडी या दोघांची निवड करण्यात आली, असा आरोप डाहुले कुटूंबानी पत्रकार परिषदेत केला असून ही निवड रद्द करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात एपीआय रियाज काझी बनणार 'माफीचा साक्षीदार'