ETV Bharat / state

व्हिडिओ: मापात पाप, चंद्रपुरात १ लिटरच्या नावावर ग्राहकांना मिळतेय पाऊण लिटर पेट्रोल - चंद्रपूरमधील पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट

शहरातील कोतपल्लीवार पेट्रोलपंपाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पेट्रोलमध्ये भेसळ करणे आणि पेट्रोल भरताना दांडी मारणे, अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. मात्र, गुरुवारी या लबाडीचा पर्दाफाश झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Aug 30, 2019, 3:55 PM IST

चंद्रपूर - शहरातील कोतपल्लीवार पेट्रोलपंपावर ग्राहकांची लूट केली जात असल्याचे समोर आले. या पंपावर एका लिटरच्या नावावर ग्राहकांना पाऊण लिटर पेट्रोल दिले जात आहे. त्यामुळे एका जागृत ग्राहकाने यावर आक्षेप घेत पंपावर होत असलेल्या लबाडीचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ तयार केला आहे.

पेट्रोलपंपावरील व्हिडिओ

शहरातील जनता कॉलेज चौकात कोतपल्लीवार पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलमध्ये भेसळ केली जाते, तसेच पेट्रोल भरताना दांडी मारली जाते, अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. मात्र, गुरुवारी या लबाडीचा पर्दाफाश झाला. ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी गेला असता त्याला पेट्रोलच्या क्षमतेबाबत शंका आली. सध्या ७७ रुपये लिटर पेट्रोल आहे. त्याने एका लिटरची बाटली आणली आणि त्यात ८० रुपयांचे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलास टाकण्यास सांगितले. या बाटलीमध्ये ८० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर ती पूर्ण भरणे गरजेचे होते. मात्र, ती जवळपास २० टक्के रिकामीच राहिली. यातून या पेट्रोल पंपामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे दिसून आले.

घटनेनंतर या ग्राहकाने याबाबत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलाकडे विचारणा केली त्यावेळी त्याने एअर पकडली, असे सांगून अंग काढण्याचा प्रयत्न केला. ग्राहकाने पंपाचे ऑफिस गाठले आणि तिथे याबाबत विचारणा केली. पण तेथील कर्मचाऱ्यांकडे सुद्धा याचे कुठलेही उत्तर नव्हते. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन त्याने ही सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे शहरातील कोतपल्लिवार पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले.

Intro:चंद्रपुर : शहरातील एका पेट्रोलपंप ग्राहकांची लूट केल्या जात असल्याचे समोर आले. एक लिटरच्या नावावर त्यांना पाऊण लिटर पेट्रोल दिले जात आहे. यावर एका जागृत ग्राहकाने आक्षेप घेतला असून ह्या ह्या लबाडीचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शहरातील जनता कॉलेज चौकात कोतपल्लीवार पंप पेट्रोल पंप आहे. या पेट्रोलपंपा बाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलमध्ये भेसळ केली जाते तसेच पेट्रोल भरताना दांडी मारली जाते अशा अनेक तक्रारी ग्राहकाकडून केल्या जात होत्या. मात्र काल या लबाडीचा पर्दाफाश झाला. ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी गेला असता त्याला पेट्रोलच्या क्षमतेबाबत शंका आली. सध्या 77 रुपये लीटर पेट्रोल आहे. त्याने एक लिटरची बॉटल आणली आणि त्यात 80 रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे पंपवर काम करणाऱ्या मुलास सांगितले. ह्या बॉटलमध्ये 80 रुपयांचे पेट्रोल भरताना ती बॉटल ऋतू जायला हवी होती मात्र ती जवळपास 20% रिकामीच राहिली. यातून या पेट्रोल पंप मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे दिसून आले. यानंतर या जागृत ग्राहकाने या प्रकाराचा व्हिडिओ बनवला त्याने याबाबत विचारणा केली असता पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलाने एअर पकडली असे सांगून अंग काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर या ग्राहक आहे या पेट्रोल पंपाच्या ऑफिस गाठले आणि तिथे याबाबत विचारणा केली मात्र तेथील कर्मचाऱ्याकडे सुद्धा हा प्रकार समोर आल्यानंतर कुठलेही उत्तर नव्हते. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन त्याने ही सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे शहरातील कोतपल्लिवार पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहेBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.