ETV Bharat / state

सिटीस्कॅन तपासणीचे दर दर्शनी भागात लावणे बंधनकारक - chandrapur private hospitals

आयआरसीटी-चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रूग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा कार्पोरेट/खासगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत.

CT scan checking
CT scan checking
author img

By

Published : Apr 3, 2021, 4:59 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटीस्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खासगी रूग्णालये किंवा सीटीस्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करांसह खालील दराप्रमाणे किंवा यापूर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी करावी, असे आदेश जिल्हाधि कारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक

एचआरसीटी चेस्ट तपासणीकरिता मशीनच्या क्षमतेनुसार निश्चित केलेले दर कंसात दर्शविल्याप्रमाणे आहेत. 16 स्लाइसपेक्षा कमीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सिटी 16-64 स्लाइसकरिता रूपये दोन हजार पाचशे, मल्टी डिटेक्टर सिटी 64 स्लाइसपेक्षा जास्त करिता रूपये तीन हजार दरनिश्चित करण्यात आले आहेत. उपरोक्त कमाल रकमेत सी. टी. स्कॅन तपासणी अहवाल, सीटी फिल्म, पी. पी. ई. किट, डिसेन्फेक्टंट सॅनिटायझेशन चार्जेस व जी. एस. टी. या सर्वांचा समावेश असेल. एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर उपरोक्तपैकी कोणत्या सी. टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे, ते नमूद करणे बंधनकारक असेल. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनाद्वारे तपासणी असल्याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही तपासणी करू नये.

सूचना देणे बंधनकारक

आयआरसीटी-चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रूग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा कार्पोरेट/खासगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत. सर्व रूग्णालये, तपासणी केंद्रे यांनी एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त हे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.