ETV Bharat / state

पाठलाग करीत असताना गो-तस्कराचा वाहतूक शिपायावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न - cow smuggler arrested

एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या प्रसंगावधाने त्याने पाठलाग करून या ट्रकला पकडले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

cow smuggler arrested
cow smuggler arrested
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:09 PM IST

Updated : Mar 19, 2021, 7:23 PM IST

चंद्रपूर - गो-तस्करी करणाऱ्या ट्रकला वाहतूक शिपायाने अडवले असता त्याच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिपायाने उडी घेतल्याने पुढील अनर्थ टळला. एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या प्रसंगावधाने त्याने पाठलाग करून या ट्रकला पकडले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ट्रक अंगावर चढविण्याचा प्रयत्न

शेजारच्या तेलंगाणा राज्यात मोठ्या प्रमाणात गो-तस्करी होते. महाराष्ट्र राज्यातून ही तस्करी होते. या सर्व तस्करीचे रॅकेट अनेक राज्यांत पसरले आहे. उत्तरेकडील राज्यातूनही ही गो-तस्करी केली जाते. यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक कारवाईत हे समोर आले आहे. आज सकाळी राजस्थान पासिंगचा RJ 11 GA 6340 हा ट्रक नागपूर-चंद्रपूर मार्गावरून येत होता. जनता कॉलेज चौकात या ट्रकने सिग्नल तोडला. त्यामुळे या ट्रकला अडविण्यासाठी येथे कार्यरत असलेल्या वाहतूक शिपायाने अडवले असता त्याच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न झाला. आपला जीव वाचविण्यासाठी त्याने उडी घेतली त्यामुळे तो थोडक्यात बचावला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशांत भारती तेथे होते. त्यांनी शिपायाकडे धाव घेतली. यानंतर त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला.

पाहणाऱ्यांना बसला धक्का

हा धाडसी पाठलाग करून वाहतूक कार्यालयाच्या जवळ या ट्रकला अडविण्यात आले. यावेळी ट्रकमधले दोन-तीन माणसे पळून गेली. मात्र, ट्रकचालकाला पकडण्यात आले. यावेळी ट्रकमध्ये तपासणी केली असता पाहणाऱ्यांना धक्का बसला. यात दोन थराचे कप्पे करत त्यात जनावरे अमानुषपणे कोंबली होती. त्यात काही जनावरांचा मृत्यूदेखील झाला होता. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले.

Last Updated : Mar 19, 2021, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.