चिमूर (चंद्रपूर)- कोरोना विषाणू संसर्गाची लाट शहरी व ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर नियंत्रण आणण्याकरीता आरोग्य यंत्रणे सह ग्रामपंचायत स्तरावर युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. चिमूर तालुक्यातील मदनापूर ग्रामपंचायतीने महात्मा गांधी राष्ट्रिय रोजगार हमी योजने अंतर्गत शेतबोडीचे काम सुरु आहे. या कामावर गावातील बहुतेक स्त्री पुरुष असल्याने कामाच्याच ठीकाणी रॅपीड व ॲन्टीजन चाचणी घेण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले. त्याप्रमाणे १५१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.
कामावरच ॲन्टीजन चाचणीचा निर्णय
१५१ मजुरांची तपासणी
मदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत व महात्मा गांधी राष्ट्रिय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतबोडी खोलीकरणाचे काम सुरु आहे. गावातील बहुतेक स्त्री- पुरुष या कामावर असल्याने येथेच आरोग्य पथकाच्या सहाय्याने रॅपीड व अँटीजन चाचणी शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमास मजुरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात १५१ नागरीकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
हेही वाचा- दिलासादायक : महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 95 टक्के, 3 महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण