ETV Bharat / state

लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुट्टी; तेही दुसऱ्यांदा चाचणी न करता

कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर 14 दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुट्टी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुट्टी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही.

चंद्रपूर न्यूज
चंद्रपूर न्यूज
author img

By

Published : May 30, 2020, 3:36 PM IST

चंद्रपूर - कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये दहा दिवसात कुठलीही लक्षणे नसतील तर त्याची दुसरी चाचणी न करता थेट सुट्टी दिली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नव्या सूचनेनुसार याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णालयात नव्या संशियातांसाठी जागा आणि चाचणीचा वेग वाढणार आहे.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर 14 दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुट्टी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही.

रुग्णालयातून सुट्टी झालेला व्यक्ती दुसऱ्याला बाधित करू शकत नाही. मात्र, एखाद्या रुग्णाची प्रकृती स्थिर नसेल तर, त्याला सुट्टी द्यायची की नाही, याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेणार आहेत. लोकांनी सुट्टी झालेल्या रुग्णांना घाबरू नये. सामाजिक अंतर पाळावे, जंतुनाशकाने हात धुवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.