चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये मंगळवारी 5 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 वर पोहोचली आहे. मंगळवारी रात्री उशिरा आणखी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने आज दिली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला युवक नवी दिल्ली जवळील गुरुग्राम येथून परत आलेला होता.
गुरुग्राम या शहरातून १२ जूनला चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या ३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती गुरुग्राम येथून आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात होता. १५ जूनला लक्षणे आढळल्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, सध्या या युवकाची प्रकृती स्थिर आहे.
मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी तीन व ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारी एकूण ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ५३ झाली आहे.
चंद्रपूरमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण 2 मे रोजी आढळला होता. कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 50 चा टप्पा मंगळवारी ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 53 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे (1), १३ मे (1) २० मे (10) २३ मे (7) आणि २४ मे (2) २५ मे (1) ३१ मे (1) २जून (1) ४ जून (2) ५ जून (1) ६जून (1) ७ जून (11) ९ जून (3) १०जून (1) १३ जून (1) १४ जून (3) १५ जून (1) १६ जून (5) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.