चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्ली येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. काल सकाळी भद्रावती येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने ते अंत्यसंस्कारात सामील होऊ शकले नाही. त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेसचे एकमेव खासदार: खासदार बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहे. भाजपची देशात लाट असताना धानोरकर यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना त्यांनी आपल्या वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या चंद्रपुरातील बंगल्याचा वास्तू उरकला होता. यानंतर त्यांची प्रकृती बिघडायला लागली. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने,त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. - कार्यालय
धानोरकर यांची प्रकृती गंभीर: त्यांचे साळे आणि स्वीय साहाय्यक प्रवीण काकडे यांच्या नावाने ईडीने पोलिसांना पत्र पाठवले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली येथे तातडीने हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून त्यांच्या प्राकृतिक सुधारणा होत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -
- MP Balu Dhanorkar खासदार धानोरकरांनी धारीवाल कंपनीला दिलेला अल्टीमेटम संपला आता पुढे काय
- Complaint Against MP Dhanorkar खासदार धानोरकरांविरोधात पोलिसांत तक्रार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाला धमकावल्याचे प्रकरण
- चंद्रपुरात इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारा खासदार धानोरकरांनी घेतली शरद पवार आणि सुभाष देसाई यांची भेट