ETV Bharat / state

'इकडून तिकडे, तिकडून इकडे निमकरांचे पक्षांत्तर सुरूच असते; त्यात नवीन काय' - sudarshan nimkar latest news

माजी आमदार निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतांनाच गडचांदूर नगरपरिषदेचा नगराध्यक्षा आणि दोन नगरसेवकांनी कमळ पुष्प हातात धरले. . एकंदरीत चित्र बघता राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट एकाच पक्षाला लाभ होईल,असे चित्र नाही. एकंदरीत निमकरांच्या भाजप प्रवेशाने भाजपाला फायदा होईल हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट कुणालाच फायदा होताना दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी , राजूरा
author img

By

Published : Oct 13, 2019, 3:06 PM IST

चंद्रपूर - राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली आहे. राजूरा मतदारसंघात शनिवारी महत्वाची राजकीय घटना घडली. माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतानाच गडचांदूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांनी कमळ पुष्प हातात धरले. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसचा सोबतीला तर काही स्वतंत्र भारत पक्षाचा प्रचारात गुंतले आहेत. एकंदरीत चित्र बघता राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट एकाच पक्षाला लाभ होईल,असे चित्र नाही. दरम्यान इकडून तिकडे, तिकडून इकडे निमकर पक्षांत्तर करत असतात त्यात नवे काय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण निमजे

ज्या गडचांदूरात नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तिथल्या नगराध्यक्षांसह दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, चार सदस्य अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी केला आहे. माजी आमदार सूदर्शन निमकर यांचा राजकीय इतिहास बघता त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आमदारकी मिळवली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. अर्ध्या तासासाठी त्यांनी शिवबंधनही बांधले होते. ते आता भाजपत जाणार आहेत. निमकरांना विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका आधीच जाहीर केली होती. त्यामुळे निमकरांशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येबाबत मतदारसंघात चिमटे काढले जात आहेत.

हेही वाचा - चंद्रपुरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित

२०१४ मधील विधानसभा निवडणूकीत निमकरांना २७ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार म्हणून आपल्याला १८ हजार मते मिळाली होती. निमकरांच्या २७ हजार मतांमध्ये आपली १८ हजार मते होती, असा दावा अरुण निमजे यांनी केला आहे. एकंदरीत निमकरांच्या भाजप प्रवेशाने भाजपाला फायदा होईल हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट कुणालाच फायदा होताना दिसत नाही.

Intro:आधे ईधर,आधे उधर,बाकी मेरे साथ
राजूरा मतदार संघातील राष्ट्रवादी विखुरली

चंद्रपुर

राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली आहे. माजी आमदार निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतांनाच गडचांदूर नगरपरिषदेचा नगराध्यक्षा आणि दोन नगरसेवकांनी कमळ पुष्प हातात धरले. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसचा सोबतीला तर काही स्वतंत्र भारत पक्षाचा प्रचारात गुंतले आहेत. एकंदरीत चित्र बघीतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस चा सरसकट एकाच पक्षाला लाभ होईल,असे चित्र नाही. दरम्यान इकडून तिकडे,तिकडून इकडे निमकर पक्षांत्तर करित असतात,त्यात नवे काय ? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी लगावला आहे.

राजूरा मतदारसंघात शनिवारला महत्वाची राजकीय घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सूदर्शन निमकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतानाच गडचांदूर नगरपरिषदेचा नगराधक्ष्या आणि दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली हे खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट फायदा कुणालाच होतांना दिसत नाही. राजूरा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते स्वतंत्र भारत पक्षाचा प्रचारात गुंतले आहे,तर काही काँग्रेसचा सोबतीने उभे आहेत. ज्या गडचांदूरात नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तेथिल नगराध्यक्षा,दोन नगरसेवकांनी कमळ हातात धरले. मात्र चार सदस्य अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी केला आहे. माजी आमदार सूदर्शन निमकर यांचा राजकीय इतिहास बघीतला तर त्यांनी काँग्रेस पक्षाचा टिकीटावर आमदारकी मिळवली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.अर्ध्या तासासाठी त्यांनी शिवबंधनही बांधले होते. आता भाजपात ते जाणार आहेत. निमकरांना विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकार्यांनी आपली भुमिका आधीच जाहीर केली होती. त्यामुळे निमकरांशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांचा संख्येबाबत मतदारसंघात चिमटे काढले जात आहेत. २०१४ मधील विधानसभा निवडणूकीत निमकरांना २७ हजारांचा आसपास मते मिळाली होती. मिळालेली मते एकट्या निमकरांची नाहीत,राष्ट्रवादी काँग्रेसची होती. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार म्हणून मला १८ हजार मते मिळाली होती. निमकरांचा २७ हजार मतात माझे १८ हजार मते होती असा दावा अरुण निमजे यांनी केला आहे. एकंदरीत निमकरांचा भाजप प्रवेशाने भाजपाला फायदा होईल हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट कुणालाच फायदा होतांना दिसत नाही आहे.Body:विडीओ
अरुण निमजे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.