ETV Bharat / state

अर्णब गोस्वामीविरोधात चंद्रपुरात तक्रार दाखल; युवक काँग्रेसकडून कारवाईची मागणी

author img

By

Published : Jan 18, 2021, 7:16 AM IST

एखाद्या पत्रकाराला देशाच्या आंतरिक सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय बाबींची माहिती असणे अत्यंत चिंतेचा विषय आहे. देशातील सामान्य नागरिकांना धोक्यात ठेवणारी ही बाब आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामीविरोधात चंद्रपुरात तक्रार दाखल

चंद्रपूर - टीआरपी घोट्याळात आरोपी असलेला पत्रकार अर्णब गोस्वामी याच्या विरोधात चंद्रपूर येथे पोलीस तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी याचे व्हाट्सअप्प संभाषण उघडकीस आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.

गोपनीय बाबींची माहिती असणे अत्यंत चिंतेचा विषय-

टीआरपी घोटाळ्या संदर्भात मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. यादरम्यान एका खासगी वाहिनीचा पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्क या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातले व्हाट्सअॅपचे संभाषण समोर आले. यात भारतात पुलवामामध्ये झालेला हल्ला आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून बालाकोट येथे भारताकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक बद्दल अर्णबला आधीच माहिती मिळाली होती. तसेच देशातील इतर सुरक्षेसंदर्भात देखील यात चर्चा केल्याचे उघड झाले आहे. एखाद्या पत्रकाराला देशाच्या आंतरिक सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय बाबींची माहिती असणे अत्यंत चिंतेचा विषय आहे. देशातील सामान्य नागरिकांना धोक्यात ठेवणारी ही बाब आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामीविरोधात चंद्रपुरात तक्रार दाखल;

कायदेशीर कारवाई करावी-

अर्णबच्या संभाषणामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या इतर विभागाच्या गोपनीय बाबींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे गोस्वामी आणि या प्रकारात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या पुढाकारात चंद्रपुरात रामनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने युवक काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शफाक शेख यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.