ETV Bharat / state

CM Talks With Amma : अम्मांना फोनवरून मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा; अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या आईला मिळाला पुरस्कार - Gangubai Jorgewar

चंद्रपूर ( Chandrapur ) विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ( Independent MLA Kishor Jorgewar ) यांच्या आई अम्मा म्हणून सुपरिचित आहेत. आपल्या मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने आणि संघर्षाने घडविले आहे. आजही त्या टोपली विकण्याचे काम करतात. त्यांच्या या असामान्य कार्याची दखल घेत एका वृत्तपत्र समूहाच्या महाराष्ट्र आयडल या उपक्रमाअंतर्गत मदर हु ईन्सपायर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ही माहिती होताच राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी थेट अम्माला फोन करून शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ कॉल होता. त्यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट वर्षा बंगल्यात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. या अनपेक्षित फोनने अम्मा देखील भारावून गेल्या.

CM Shinde Congratulate Amma
CM Shinde Congratulate Amma
author img

By

Published : Jul 1, 2022, 10:24 PM IST

चंद्रपूर - अम्मा म्हणजेच गंगुबाई गजानन जोरगेवार ( Gangubai Jorgewar ). आज जोरगेवार परिवात जे ऐश्वर्य दिसते त्यात कुटुंब प्रमुख असलेल्या अम्माचे कष्ट, त्यांचा संघर्ष दडलेला आहे. सुरुवातीला घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते. पोटाची भूक अस्वस्थ करणारी होती. किर्रर्र जंगलात जाणे, बांबू तोडून त्यापासून टोपल्या विकणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. हातावर आणून पानावर खाणे असा दिनक्रम या कुटुंबाचा होता. अशातही अम्मा कधी खचल्या नाहीत. कष्ट आणि संघर्षाच्या मार्गावर त्या चालत राहल्या. अशात मोठा मुलगा किशोर जोरगेवार हे 8 वर्षाचे असताना त्याच्या पायाला जखम झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. या दरम्यान अम्माने मीठ-पोळी चारून किशोर यांचा नागपूर येथे उपचार केला. मात्र, वेळेवर रक्त उपलब्ध होऊ न शकल्याने किशोर यांना कायमचे दिव्यांगत्व आले. मात्र अम्मा खचल्या नाही. महानगरपालिकेसमोर फूटपाथवर टोपल्या विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरूच ठेवला. आज अम्मांचा एक मुलगा किशोर जोरगेवार हे चंद्रपूरातील आमदार ( Independent MLA Kishor Jorgewar ) आहेत. तर दुसरा मुलगा प्रशांत जोरगेवार चंद्रपूरातील प्रसिध्द व्यावसायिक आहे. अम्माला आज मोठा पुरस्कार जाहीर झाला आणि थेट मुख्यमंत्र्यांनी अम्मांचे फोन करून अभिनंदन केले.

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईंना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

चंद्रपुरात अम्मा का टिफीन - आज घरी श्रीमंती नांदत आहे. असे असतांनाही अम्माने कष्टाचा मार्ग सोडलेला नाही. आज सत्तरी ओलांडली असली तरी अम्माने महानगरपालिकेसमोर टोपल्या विकण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे. एकेकाळी मुलाला मीठ-पोळी चारुन जगवले याची जाण आजही अम्माला आहे. त्यामुळे किशोर जोरगेवार हे निवडून येताच अम्माने चंद्रपूरात कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी काम करण्याचे किशोर जोरगेवार यांना सांगितले होते. अम्माची आज्ञा पाळत त्यांनी चंद्रपुरात अम्मा का टीफिन हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत गरजूंना घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. अम्माने दिवसभर टोपल्या विकून मिळविलेल्या पैशातून या उपक्रमाला हातभार लावल्या जात आहे. याची दखल घेत एका वृत्तपत्र समुहाने मदर हु ईन्सपायर हा या पुरस्कारासाठी अम्माचे नाव नामांकित केले आहे. अम्माला मिळालेल्या या पुरस्काराबदल आज राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माला व्हिडीओ कॉल करत शुभेच्छा दिल्यात. अम्माचे काम कौतुकास्पद आहे. पुरस्काराचा कार्यक्रम करून घ्या त्यानंतर एक दिवस वर्षा बंगल्यावर या असे आमंत्रनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माला दिले आहे.

हेही वाचा - Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.