ETV Bharat / state

जोरगेवारांच्या संभ्रमावर मुख्यमंत्र्यांचे 'डॅमेज कंट्रोल', सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन - देवेंद्र फडणवीस जोरगेकर

जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजपविरोधात टीकेची झोड उडविली होती. आपण कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच सर्व समाज, सर्व वर्गातील मतदारांनी जोरगेवार यांना भरभरून मतदान केले. मात्र, ऐनवेळी जोरगेवार यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागला.

CM fadanvis on Jorgewar
author img

By

Published : Oct 31, 2019, 8:07 AM IST

चंद्रपूर - अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. जोरगेवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे अधिकृतरित्या काल जाहीर केले. त्यानंतर जोरगेवार यांच्याविरोधात संतापाची लाट उसळू नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना समोर यावे लागले. आपल्या नेतृत्वात बनणाऱ्या सरकारला जोरगेवार यांचा पाठिंबा असून त्यांच्या मतदारसंघातील मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

जोरगेवारांच्या संभ्रमावर मुख्यमंत्र्यांचे 'डॅमेज कंट्रोल', सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन

जोरगेवार यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्यांच्याऐवजी महेश मेंढे यांचे नाव समोर आले. त्यामुळे, जोरगेवारांनी अपक्ष लढण्याची तयारी केली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐनवेळी त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यांनी तो भरल्यानंतर तो फॉर्म अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे त्यांना पुन्हा अपक्षच लढावे लागले. मागील पाच वर्षांत सातत्याने जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारावर अन्याय झाला अशी अनेकांची भावना तयार झाली. त्यामुळे जोरगेवार यांना लोकांची सहानुभूती मिळण्यास सुरुवात झाली. जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजपविरोधात टीकेची झोड उडविली होती. आपण कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच सर्व समाज, सर्व वर्गातील मतदारांनी जोरगेवार यांना भरभरून मतदान केले. 2014 मध्ये पराभूत झालेले जोरगेवार हे यावेळी तब्बल 75 हजारांच्या फरकाने निवडून आले.

मात्र, जिंकून आल्यानंतर ऐनवेळी त्यांनी आपल्या भूमिकेला बगल दिली. मूळचे भाजपचे असलेले जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. यापूर्वी अशा अनेक चर्चा उठत असताना जोरगेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, ऐनवेळी जोरगेवार यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जोरगेवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा : 'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार'

Intro:चंद्रपूर : सर्व पक्षांच्या मतदारांनी डोक्यावर घेतलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा सुरु झाली होती. यावर मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. जोरगेवार यांनी आपण भाजपला पाठिंबा देण्याचे अधिकृतरित्या आज जाहीर केले. जोरगेवार यांच्याविरोधात संतापाची लाट उसळू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना समोर यावे लागले. आपल्या नेतृत्वात बनणाऱ्या सरकारला जोरगेवार यांचा पाठिंबा असून त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

भाजपचे उमेदवार आणि सलग दोन वेळा निवडूण आलेले नाना श्यामकुळे यांच्या विरोधात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची थेट लढत होती. त्यांनी 75 मताधिक्याने श्यामकुळे यांना पराभूत केले. यामागचे कारणही तसेच आहे. जोरगेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या जागी महेश मेंढे यांचे नाव समोर आले. त्यामुळे अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी केली. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐनवेळी त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यांनी तो भरला. मात्र, त्यांचा फॉर्म अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे जोरगेवार यांनी नाईलाजाने अपक्ष लढावे लागले. ह्याच वेळी जोरगेवार यांना मोठ्या प्रमाणात जनमत मिळायला लागले. मागील पाच वर्षांत सातत्याने जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारावर अन्याय झाला अशी अनेकांची भावना तयार झाली. त्यामुळे जोरगेवार यांना लोकांची सहानुभूती मिळण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी जोरगेवार यांचे काम सुरू केले. जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजपविरोधात टीकेची झोड उडविली होती. आपण कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच सर्व समाज, सर्व वर्गातील मतदारांनी जोरगेवार यांना भरभरून मतदान केले. 2014 मध्ये पराभूत झालेले जोरगेवार हे यावेळी तब्बल 75 हजारांच्या फरकाने निवडून आले.

मात्र, जिंकून आल्यानंतर ऐनवेळी त्यांनी आपल्या भूमिकेला बगल दिली. मूळचे भाजपचे असलेले जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. यापूर्वी अशा अनेक चर्चा उठत असताना. जोरगेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, ऐनवेळी जोरगेवार यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्यामुळे सामान्य माणसात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान जोरगेवार यांनी आपले अधिकृत समर्थान देवेंद्र फडणवीस यांना जाहीर केल्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जोरगेवार यांचे समर्थन मिळाल्याचे आभार व्यक्त केले.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.