ETV Bharat / state

मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना ट्रकने चिरडले; एकाचा मृत्यू, एक गंभीर - chandrapur road accident

शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Jun 11, 2020, 10:50 AM IST

चंद्रपूर - शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील बाबूपेठ परिसर हा जुनोना जंगलाला लागून आहे. या रस्त्यावर जास्त वाहनांची वर्दळ नसते, म्हणून या मार्गावर मॉर्निंगवॉक करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जात असतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे अनेक नागरिक या रस्त्यावर चालत होते. यावेळी अनियंत्रित झालेल्या ट्रक थेट नागरिकांच्या अंगावर गेला.

अपघातात शेंडे नामक 60 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.