ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड, चिमूर नगरपरिषदेची कार्यवाही - दंड चिमूर नगरपरिषद

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचा कालावधी वाढतच आहे. ज्यामुळे सामान्य नागरिक, गरीब, मजूर, उद्योग, व्यवसाय प्रभावित झाले असून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

chimur
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड, चिमूर नगरपरिषदेची कार्यवाही
author img

By

Published : May 21, 2020, 3:38 PM IST

चंद्रपूर - लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेल्या परिस्थिती थोडी पूर्वपदावर यावी, यासाठी काही अटीशर्ती ठेऊन दुकाने, प्रतिष्ठाने व बाजारपेठा सुरू करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, चिमूर येथील हार्डवेअर दुकानदार सतत या अटींचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नगरपरिषदेने त्यांच्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारून दोन दिवस दुकान बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचा कालावधी वाढतच आहे. ज्यामुळे सामान्य नागरिक, गरीब, मजूर, उद्योग, व्यवसाय प्रभावित झाले असून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सर्व व्यवहारांची साखळी खंडीत झाली आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोननुसार उद्योग व्यवसाय व सामान्यांच्या जीवनाची घडी बसण्यासाठी काही अटीशर्ती ठेऊन शासनाने लॉकडाऊन शिथील केले. मात्र यामूळे अनेक नागरिक, दुकानदार हे शासनाने घातलेले नियम विसरल्याचे सर्वत्र दिसून येते.

चिमूर नगरपरिषदेने लॉकडाऊनचे नियम मोडणाऱयांवर कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सचे उल्लघंन करणाऱ्या पूजा वस्त्र भंडार, वरोरावाला वस्त्र भंडार यांच्यावर प्रत्येकी ५ हजार रुपयाचा, तर कलीम रेडिमेट यांच्यावर पाचशे रुपयाचा दंड ठोठावला. हार्डवेअरचा व्यवसाय असणारे शरद गुप्ता व पवन गुप्ता यांच्याकडून लॉकडाऊनचे सतत उल्लघंन केल्याचे लक्षात घेऊन प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या दंडासह दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे.

याशिवाय, सार्वजनिक ठिकणी थुंकणाऱ्या उदेश रामटेके याला दीडशे रुपये, मास्क न लावणाऱ्या अजय वांधरे, सोनु कसारे, अकीम शंभरकर, पराग उरकुडे, अंकुश पेंदाम, रवींद्र उईके, विशाल मगरे ( वाघेडा ), सोमेश्वर भोयर (तळोधी) यांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड चिमूर नगरपरिषदेकडून आकारण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.