चंद्रपूर - जिल्ह्यातील चिखलापार या गावात 26 ऑगस्ट या दिवशी आलेल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. चिमूरचे उपविभागीय अधिकारी भैय्या बेहरे यांनी या परिस्थितीतून गावकऱ्यांची सुखरूप सुटका केली.
गावाच्या उशाशी असलेला तलाव तुडुंब भरलेला, तो जर फुटला असता तर...
चिखलापार या संपूर्ण गावाला पुराचा वेढा होता. गावाला एखाद्या बेटाचे स्वरूप आले होते. त्यातच गावापासून काही अंतरावर असलेला तलाव तुडुंब भरला होता. तो फुटला तर संपूर्ण गावच वाहून जाण्याची भीती होती. अशावेळी तत्काळ कृती करणे आवश्यक होते. चिमूरचे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यावेळी गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले.
हेही वाचा... विद्यार्थ्यांनी साकारले बांबूपासून 'बाप्पा', बांबू संशोधन केंद्राचा अभिनव उपक्रम
पुराने वेढलेल्या गावातून बाहेर पडण्यासाठी एकही पक्का रस्ता नसल्याने सरपंच संतोष डांगे यांनी स्थानिक पत्रकाराला ही सर्व हकीकत सांगितली. पत्रकाराने ही बाब उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या कानावर घातली. बेहरे यांनी तत्काळ प्रशासकीय, पोलीस यंत्रणा घेऊन चिखलपार गाठले. सहारे हे अधिकारीही त्यांच्या सोबत होते.
हेही वाचा... दोन कोटींच्या दारूसाठ्यावर फिरवला रोलर, चंद्रपूर पोलिसांची कारवाई
पूरग्रस्तांना गाडीतून चिमूर येथे पोचविण्याचे काम सुरू झाले. बेहरे यांनी स्वतःचे वाहन देखील या कामासाठी लावले. वृद्ध, स्त्रिया, मुले यांना अगोदर गावाबाहेर काढण्यात आले. हळूहळू पाण्याची पातळी वाढत जात होती, यावेळी वाहनातून बचावकार्य करणे जोखमीचे झाले. त्यातच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगावचा तलाव फुटण्याची भीती होती. त्यामुळे चंद्रपूर येथून बोटी मागविण्यात आल्या. 195 लोकसंख्या असलेल्या गावातील शेवटचा व्यक्ती बाहेर काढण्यापर्यंत बेहरे हे तिथेच होते.
हेही वाचा... चंद्रपूर : तीस जनावरांचा बळी गेल्यानंतरही क्षतीग्रस्त पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच
या सर्व पूरग्रस्तांसाठी शेतकरी भवन येथे राहणे, जेवण, औषधोपचार आणि इतर साहित्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यानंतरही गावात कोणी एखादा व्यक्ती राहिला नाही ना याची खातरजमा करण्यासाठी रात्री साडे बारा वाजता बेहरे हे पुन्हा चिखलपार येथे गेले. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता बघून नागरिक सुद्धा भारावून गेले.
हेही वाचा... चंद्रपूरमधील इरई धरण भरले; दोन दरवाजातून विसर्ग सुरू
बेहरे यांची आतापर्यंतची कारकिर्द अशीच आदर्शवत राहिली आहे...
उपविभागीय अधिकारी म्हणून बेहरे 1 सप्टेंबर 2018 ला चिमूर येथे रुजू झाले. यापूर्वी 2014 मध्ये बांद्रा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी अतिक्रमणाविरोधात धाडसी कारवाई केली होती, यासाठी त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2016 मध्ये मुंबई उपनगराचे तहसीलदार म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना विभागस्तरावर पुरस्कृत करण्यात आले होते.
हेही वाचा... व्हिडिओ: मापात पाप, चंद्रपुरात १ लिटरच्या नावावर ग्राहकांना मिळतेय पाऊण लिटर पेट्रोल