ETV Bharat / state

चंद्रपूर : कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्या २,३५१ जणांवर मनपाची कारवाई, चाडेचार लाखांचा दंड वसूल

author img

By

Published : Jul 19, 2020, 8:51 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे नियम घालून देण्यात आले आहे. मात्र, काही नागरिक याचे सपशेल उल्लंघन करताना दिसत आहे. अशा २ हजार ३५१ लोकांवर चंद्रपूर मनपाने कारवाई केली आहे. या कारवाईत नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ४ लाख ७८ हजार १९० रुपयाचा दंडही वसूलण्यात आला आहे.

चंद्रपूर मनपाची कारवाई
चंद्रपूर मनपाची कारवाई

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या २ हजार ३५१ लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली आहे. या कारवाईत नागरिकांकडून ४ लाख ७८ हजार १९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. तर, विनापरवानगी दुकान सुरू ठेवणाऱ्या व अवैध खर्रा विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पाहता काही दिवसांकरता प्रशासनातर्फे लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांचेही याला उत्स्फुर्त सहकार्य लाभत असल्याने लॉकडाऊन करण्याचे प्रयोजन यशस्वी होण्यास मदत मिळत आहे. मात्र, काही गैरजबाबदार नागरिक या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे, सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे तसेच अवैध खर्रा विक्री करणारे आढळून आल्यास महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र, काही नागरिक सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा १९० लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला २ मास्कसुद्धा देण्यात येत आहे. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत. मास्क न लावणाऱ्या 2 हजार 61 जणांवर कारवाई करत 4 लाख 11 हजार 140 रुपये इतका दंडही वसूल करण्यात आला आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 190 व्यक्तींवर केलेल्या कारवाईत 22 हजार 100 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला. विनापरवानगी दुकाने उघडणाऱ्या सहा दुकानदारांकडून 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे, आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावून ठेवण्याचे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.