ETV Bharat / state

लोकसभा चंद्रपूर : काँग्रेसचे बाळू धानोरकर ठरले  जायंट किलर.. केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांचा केला पराभव - बाळू धानोरकर

बाळू धानोरकर हे राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला आहे.

Lok Sabha Result चंद्रपूर : हंसराज अहिर मारणार का विजयी चौकार, थोड्याच वेळात चित्र होईल स्पष्ट
author img

By

Published : May 23, 2019, 6:04 AM IST

Updated : May 23, 2019, 11:40 PM IST

Live Updates-

  • 05.58 PM - बाळू धानोरकर 24 हजार 789 मतांनी आघाडीवर
  • 03.21 PM- बाळू धानोरकर 17 हजार 469 मतांनी आघाडीवर
  • 02.53 PM- बाळू धानोरकर 12 हजार 37 मतांनी आघाडीवर
  • 02.33 PM- बाळू धानोरकर 10 हजार 168 मतांनी आघाडीवर
  • 02.17 PM - बाळू धानोरकर 6 हजार 952 मतांनी आघाडीवर
  • 01.17 PM - हंसराज अहिर - 96,336 बाळू धानोरकर - 1,03,112 राजेंद्र महाडोळे- 19,985 मते
  • 12.14 PM - हंसराज अहिर - 88,274 बाळू धानोरकर - 94,438 राजेंद्र महाडोळे- 17,347 मते
  • 12.14 PM - हंसराज अहिर - 80,189, बाळू धानोरकर - 82,910 राजेंद्र महाडोळे- 15,561 मते
  • 12.14 PM - हंसराज अहिर - 78,987, बाळू धानोरकर - 80,851 राजेंद्र महाडोळे- 15,203 मते
  • 12.01 PM - हंसराज अहिर - 64,301, बाळू धानोरकर - 62,923, राजेंद्र महाडोळे- 10,678 मते
  • 12.00 AM - हंसराज अहिर आघाडीवर
  • 11.37 AM - बाळू धानोरकर आघाडीवर
  • 11.37 AM - हंसराज अहिर - 56027, बाळू धानोरकर - 57018, राजेंद्र महाडोळे- 9873 मते
  • 10.22 AM - हंसराज अहिर - 50838, बाळू धानोरकर - 47672, राजेंद्र महाडोळे- 8824 मते
  • 10.59 AM - हंसराज अहिर - 47213, बाळू धानोरकर - 44085, राजेंद्र महाडोळे- 8373 मते
  • 10.59 AM - बाळू धानोरकर आघाडीवर
  • 10.52 AM - हंसराज अहिर - 34666, बाळू धानोरकर - 34256, राजेंद्र महाडोळे- 6202 मते
  • 10.33 AM - हंसराज अहिर - 32013, बाळू धानोरकर - 29883, राजेंद्र महाडोळे- 5237 मते
  • 10.11 AM - हंसराज अहिर - 25481, बाळू धानोरकर - 22922, राजेंद्र महाडोळे- 4189 मते
  • 09.44 AM - हंसराज अहिर - 16225, बाळू धानोरकर - 16176, राजेंद्र महाडोळे- 3454 मते
  • 09.28 AM - हंसराज अहिर आघाडीवर
  • 08.00 AM - मतमोजणीला सुरुवात

चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीच्या चंद्रपूर मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही मतमोजणी चंद्रपुरातील महाराष्ट्र स्टेट वेअर कार्पोरेशन गोडाऊन पदोडी या ठिकाणी होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर तर भाजपकडून सलग तीन वेळा निवडून आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे मैदानात आहेत. मात्र, वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळेंनी रंगत आणलेल्या या निवडणुकीत मंत्री अहिर विजयाचा चौकार मारणार की, काँग्रेसचे धानोरकर गुलाल उधळणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. यावेळी या मतदारसंघात ६४ टक्के इतके मतदान झाले आहे.

Live Lok Sabha Result चंद्रपूर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी सांभाळली. तर भाजपच्यावतीने गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मैदान गाजवले. तर प्रकाश आंबेडकरांनीही चंद्रपूर येथे महाडोळे यांच्या प्रचारारार्थ सभा घेतली. मात्र, या सभेला खासदार असदुद्दीन आवेसी हे उपस्थित नव्हते.

निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून शिवसेनेतून आलेले आमदार बाळू धानोरकर यांना ही उमेदवारी दिल्याने बराच गदारोळ झाल्याने काँग्रेसची उमेदवारी देशभर गाजली होती. तर तीन वेळापासून खासदार असलेले अहिर यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी स्थानिक प्रश्नावर त्यांनी काही ठोस केल्याचे दिसून येत नाही, अशी नाराजी मतदारांमधून व्यक्त केली जात होती. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत.

२०१४ ची परिस्थिती-

२०१४ यामध्ये काँग्रेसतर्फे राज्याचे माजी सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांना तिकीट मिळाले तर आपकडून वामनराव चटप हे उमेदवार होते. या दोघांवरही मात करीत अहिर यांनी मोठ्या मताधिक्यांनी चंद्रपूर लोकसभेवर विजय मिळविला होता. गेल्यावेळी या मतदारसंघात एकूण 63 टक्के मतदान झाले होते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.