ETV Bharat / state

चंद्रपूर : आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 वर - चंद्रपूर कोरोना रुग्ण

चंद्रपूरमध्ये आणखी दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे.

chandrapur district two new corona positive
चचंद्रपुरात आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 25, 2020, 12:01 PM IST

चंद्रपूर - रविवारी चंद्रपूरमध्ये आणखी दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण 21 झाली आहे. 23 मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे 24 मे रोजी सकाळी 19 पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी 21 झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सायंकाळी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हे दोन्ही रुग्ण दाखल आहेत. शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवक 11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम क्वारंटाईन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.