चंद्रपूर: सभेत उपस्थित जनतेकडून प्रतिसाद मिळवण्याच्या नादात नेते अनेकदा बेताल वक्तव्य करून जातात. यात कधी आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला जातो. चंद्रपूरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचाही असाच एक प्रताप समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना धानोरकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदार धानोरकरांची जीभ घसरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलं 'हे' आक्षेपार्ह विधान - धानोरकर यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना धानोरकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. त्याच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदार धानोरकरांची जीभ घसरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलं आक्षेपार्ह विधान
चंद्रपूर: सभेत उपस्थित जनतेकडून प्रतिसाद मिळवण्याच्या नादात नेते अनेकदा बेताल वक्तव्य करून जातात. यात कधी आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला जातो. चंद्रपूरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचाही असाच एक प्रताप समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना धानोरकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Intro:nullBody:चंद्रपूर : उपस्थित जनतेकडून प्रतिसाद मिळवण्याच्या नादात नेते अनेकदा बेताल वक्तव्य करून जातात. यात कधी आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला जातो. चंद्रपूरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा असाच एक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना धानोरकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केलेला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्याचे टाळले. उलट त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी आपण जहरी टीकेचे प्रत्युत्तर हे प्रेमाने देईल. कारण काँग्रेसची ही संस्कृती नाही असे वारंवार जाहीर सभेत सांगितले. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत असलेले बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचे तिकीट मिळविले आणि निवडूनही आले. राज्यातून निवडून आलेले ते काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. म्हणून त्यांची काँग्रेसच्या गोटात पतही वाढली आहे. मात्र, काँग्रेसच्या संस्कृतीत मिसळायला अजूनही वेळ आहे. धानोरकर यांच्या आजच्या भाषणांत हे दिसून आले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या संदर्भात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर यांचा तोल सुटला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे धानोरकर यांची कोंडी वाढण्याची शक्यता आहे.Conclusion:null

Last Updated : Nov 7, 2019, 3:27 AM IST