ETV Bharat / state

चंद्रपूर : 'या' सत्ताधारी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना डच्चू मिळण्याची शक्यता

काँग्रेस आणि शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ह्यांना पदावरून हटवले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

district president will change
काँग्रेस आणि शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांना बदलणार?
author img

By

Published : Nov 10, 2021, 8:11 AM IST

चंद्रपूर - काँग्रेस आणि शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ह्यांना पदावरून हटवले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

प्रकाश देवतळेंना हटवण्याची तयारी?

प्रकाश देवतळे हे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ह्यांचे खंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी दोन वेळा सांभाळली. मात्र त्यांच्यावर कायम निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र त्यांच्या संस्थेत आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा प्रकाश देवतळे यांना संधी देण्यात आली. तर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून खासदार बाळू धानोरकर यांचे समर्थक समजले जाणारे रामू तिवारी यांना संधी देण्यात आली. मात्र आता देवतळे यांना या पदावरून हटविण्याची तयारी सुरू झाली आहे. या पदासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत तर डॉ. सतीश वारजूरकर यांच्या नावांपैकी एकावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे पद देवतळे यांच्याकडून लवकरच काढून घेण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुखावर 'हा' गंभीर आरोप

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना देखील डच्चू देण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. पक्षश्रेष्ठींकडे संभावित उमेदवारांची नावे पाठविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. नितीन मत्ते यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावर झालेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले. सात लाख रुपये हिसकावून मारहाण केल्याच्या गंभीर आरोपाखाली सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मत्ते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रसंगी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. हे प्रकरण पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचले असून याची नोंद घेण्यात आली आहे. एरव्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर राजकीय गुन्हे नोंदविले जातात. मात्र, मत्ते यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे त्यांना आता जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवे चेहरे लवकरच दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात विद्यार्थी अडकले चंद्रपुरात; मनसे धावली मदतीसाठी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.