ETV Bharat / state

आनंदवन पुन्हा झाले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'; पुन्हा कोविड केअर केंद्र - आनंदवनात कोरोनाचे रुग्ण वाढले

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरत आहे. आतापर्यंत 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन येथे आतापर्यंत १२०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज २५० लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Mar 10, 2021, 3:18 PM IST

चंद्रपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रख्यात आनंदवन पुन्हा एकदा कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहे. सध्या येथे तब्बल 239 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने प्रशासनाने येथेच कोविड केअर केंद्र उघडले आहे. येथे तपासणी करण्यात आलेल्यापैकी 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या एकूण 83 प्रकल्प रहिवाशांवर सुरू आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणेने परिसरात चाचण्यांसाठी केंद्र उभारले आहे. वरोरा आणि त्यातही आनंदवन प्रकल्प कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरत आहे. आतापर्यंत 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन येथे आतापर्यंत १२०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज २५० लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाचा हा उद्रेक गेल्या एका आठवड्यात अचानक झाला असून आनंदवनमध्ये पूर्ण टाळेबंदी लावण्यात आली आहे. प्रशासनाने या ठिकाणीच एक कोरोना केंद्र तयार केले असून सध्या याठिकाणी 83 लोकांवर उपचार सुरू आहेत. आनंदवनामध्ये झालेल्या कोरोनाच्या या उद्रेकाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. कारण गेल्या वर्षापासून आनंदवनमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे उपचारासाठी बाहेर गेलेल्या एखाद्या आनंदवनामधील व्यक्तीमुळेच हा संसर्ग आत आल्याची आणि या ठिकाणच्या निवास-भोजन आदी सर्व व्यवस्था सामुदायिक असल्यामुळे तो तातडीने पसरल्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.