ETV Bharat / state

इतर राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील १३ हजार ७३९ मजुरांशी प्रशासनाकडून संपर्क साधणे सुरू - चंद्रपूर लॉकडाऊन

जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राशिवाय अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत.

डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी , चंद्रपूर

author img

By

Published : May 1, 2020, 12:01 PM IST

चंद्रपूर - लॉकडाऊनमध्ये जवळपास १९ राज्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १३ हजारावर मजूर अडकले आहेत. तसेच राज्यात व राज्याबाहेर हजारो यात्रेकरू, विद्यार्थी, प्रवासी अडकले आहेत. या सर्वांना जिल्ह्यात पोहचण्यासाठीच्या उपाय योजना जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्वाधिक मजूर हे तेलंगाणा राज्यात आहे. मजुरांची तेलंगाणातील सध्या उपलब्ध असणारी आकडेवारी 10 हजार 558 आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेशमध्ये जवळपास 2,643 नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब ,उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा ,पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, दमन, तामिळनाडू, हरियाणा, गोवा आदी राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची माहिती आहे.

याशिवाय जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राशिवाय अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी पाच दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून ०७१७२- २७४१६६, ६७, ६८, ६९, ७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.

डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी , चंद्रपूर

जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांनी आपल्या भागात जाताना संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवासी व नागरिकांनी ज्या राज्यात जायचे आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी व आयुक्त महानगर पालिका यांच्याकडे द्यावी. त्यानंतर जिथे जायचे आहे, त्या ठिकाणासाठी परवाना घेणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय दाखला घेणे आवश्यक आहे. बाहेर राज्यातून व महाराष्ट्रातील अन्य शहरातून येणार्‍या प्रत्येक नागरिकाने देखील हीच प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या वाहनावर परवानगी लावणे, तपासणी करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे व आपल्या शहरात आल्यानंतर प्रत्येकाने 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाईन होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.