ETV Bharat / state

Chandrapur RTO Dept : आरटीओ अधिकाऱ्याच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडूनच केराची टोपली; डीएनआरचे डिझेल टँकर शोधण्यास अधिकाऱ्याची दिशाभूल - डीएनआरचे डिझेल टँकर

डीएनआरचे ट्रॅव्हल्स कंपनीच्या डिझेल टँकरद्वारे भर रस्त्यात थेट ट्रॅव्हल्समध्ये डिझेल भरण्यात येत ( Fuel Fill In Tanker At Public Place ) असल्याचा धक्कादायक प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला. हे वाहन संशयित असून याला ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याची परवानगी आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बातमी प्रकाशित होताच आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी तत्काळ हे (MH 34 BG 5977) वाहन जप्त करून त्याची तपासणी करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र तब्बल पाच दिवस लोटूनही हा टँकर मिळत नसल्याची सबब कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

Chanhdrapur RTO
डीएनआरचे डिझेल टँकर
author img

By

Published : Jun 9, 2022, 5:50 PM IST

चंद्रपूर - डीएनआरचे ट्रॅव्हल्स कंपनीच्या डिझेल टँकरद्वारे भर रस्त्यात थेट ट्रॅव्हल्समध्ये डिझेल भरण्यात येत ( Fuel Fill In Tanker At Public Place ) असल्याचा धक्कादायक प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला. हे वाहन संशयित असून याला ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याची परवानगी आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बातमी प्रकाशित होताच आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी तत्काळ हे (MH 34 BG 5977) वाहन जप्त करून त्याची तपासणी करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र तब्बल पाच दिवस लोटूनही हा टँकर मिळत नसल्याची सबब कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हे टँकर नागपूर महामार्गावरील ओम भवन सभागृहाच्या परिसरातील डीएनआरच्या कार्यालयाच्या बाजूला उभे आहे. असे असताना देखील कर्मचारी हे वाहन जप्त करू शकले नाही, त्यामुळे या आरटीओ विभागातील यंत्रणेचे डीएनआर ट्रॅव्हल्स सोबत कसे मधुर संबंध आहेत याची प्रचिती येत आहे. डीएनआर ट्रॅव्हल्सशी हातमिळवणी करीत हे कर्मचारी खुद्द उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीच दिशाभूल करीत आहेत.

यंत्रणेकडून डोळेझाक - चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या आहेत. चिचपल्ली मार्गावर डिझेल टँकरच्या भीषण अपघातात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की मृताकाचे सांगाडे सुद्धा मिळू शकले नाही. तर दुसरी घटना ही बल्लारपूर येथे घडली. बल्लारपूर पेपरमिलच्या लाकूड डेपोला आग लागली, टेबल 55 हजार टन लाकूड यात जळून राख झाले. आगीच्या एका लहान ठिणगीने ह्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे डीएनआर ट्रॅव्हल्सद्वारे भर रस्त्यावर टँकरने ट्रॅव्हल्समध्ये डिझेल भरले जात होते. MH 34 BG 5977 या वाहन क्रमांकांच्या टँकरमधून डिझेल भरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता, असे करणे बेकायदेशीर आहे. मात्र कारवाई करण्यास शासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात होती. याबाबत 3 जूनला ईटीव्ही भारतने हे प्रकरण उजेडात आणले होते.

आरटीओ यंत्रणा डीएनआर ट्रॅव्हल्सच्या मदतीला - डीएनआर ट्रॅव्हल्स हा प्रवासी वाहतूक आणि अवजड वाहतूक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व निर्माण करणारा ग्रुप आहे, संपूर्ण विदर्भात हे जाळे पसरले आहे. ट्रॅव्हल्सच्या संचालकांचे बडे राजकारणी आणि प्रशासनातील बडे अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध आहेत. आरटीओ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांचे मधुर संबंध असल्याने त्यांची कार्यालयातील कामे बिनदिक्कत होत असतात. ईटीव्ही भारतने 3 जूनला डिझेल टँकरची बातमी प्रकाशित केली असता आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी हे वाहन कार्यालयात जमा करून त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश परिवहन निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र तब्बल पाच दिवस लोटले तरी या डिझेल टँकरचा शोध संबंधित कर्मचारी लावू शकले नाही. विशेष म्हणजे हे वाहन नेहमी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील ओम भवन समोरील डीएनआर कार्यालयासमोर उभे असते. अजूनही हे वाहन तिथेच आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता देखील हे टँकर याच ठिकाणी होते. याबाबत डीएनआर ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापक, संचालक यांची चौकशी केल्यास याबाबत सहज माहिती मिळू शकते. मात्र इतकी साधी बाब कर्मचाऱ्यांचा लक्षात आली नाही, की जाणूनबुजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले ही संशय आणि आश्चर्याची बाब आहे. या विभागातील यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचीन्ह निर्माण करणारे आहे, आम्ही खूप शोध घेत आहोत मात्र हे टँकर अद्याप आम्हाला मिळाले नसल्याची सबब हे कर्मचारी आरटीओ अधिकाऱ्याला देत आहेत. त्यामुळे हे कर्मचारी आरटीओ विभागासाठी काम करतात की डीएनआरसाठी? असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

आरटीओ अधिकारी कर्मचाऱ्यांचा घेणार वर्ग - याबाबत आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांची विचारणा करणार असे ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. अजून आम्हाला वाहन मिळाले नाही असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र जर याबाबत काही हलगर्जीपणा झाला असल्यास कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारण्यात येईल असे मोरे म्हणाले.

हेही वाचा - Chanhdrapur Fueling At Public Place : चंद्रपुरात सार्वजनिक ठिकाणी थेट टँकरने होत आहे इंधनपुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.