ETV Bharat / state

कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या - gajanan butake

खरीप हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी वर्ग आता रब्बी हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयात बियाणे येऊनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे चिमूर कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Nov 22, 2019, 7:10 PM IST

चंद्रपूर - चिमुर तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे उपल्ब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बियाण्याच्या मागणीसाठी शेकडो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे चिमूर कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ

चिमूर तालुक्यात नेरी, मांसळ, खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. खरीप हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी वर्ग रब्बी पीक पेरणीच्या तयारीला लागला आहे. शासनाकडून अनुदानित बीयाणे मिळावे, यासाठी शेतकरी तालुका कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. बियाणे येऊनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे प्रशासनाने त्वरीत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:चिमुर तालुका क्रुषी विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांमध्ये असंतोष
शेकडो शेतकऱ्यांचा जीप सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन

चिमूर
-चिमुर तालुका क्रुषी विभागाकडून शेत कऱ्यांना सवलतीच्या दरात हरभरा (चना) पिकाचे प्रमाणित बियाने मिळत नसल्याने शेतकऱ्यांनमध्ये असंतोष निर्माण झाला होता .त्यामुळे जीप सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात शेकडो चना उत्पादक शेतकऱ्यांसह शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले मात्र आंदोलकांनी हरभरा चे बियाणे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली
चिमूर तालुक्यात नेरी , मांसळ, खडसंगी,भिसी, शंकरपुर परिसर खरीप पिकासाठी धान,कापूस, सोयाबीन आदी पिकासह रब्बी पिकासांठी हरभरा,गहू याचे पिक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आता शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपला आहे त्यामुळे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागला आहे .शासन स्तरावरून अनुदान तत्वावर हरभरा चना मिळण्याकरिता चिमुर तालुका क्रुषी कार्यालयाचे उंबरठे झिझवितांना दिसून येत आहे .तरीही शेतकऱ्यांना हरभरा (चना)मिळाला नाही .
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणीत बियानासाठी २ हजार ६२२ क्विंटलचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे तरीही मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यां मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष खदखदत आहे.
याबाबत तालुका क्रुषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रमाणित हरभरा चना कधी मिळणार असे विचारले असता एक दोन दिवसात हरभऱ्याची गाडी येणार आहे असे सांगितले जात आहे मात्र दहा बारा दिवसाचा कालावधी लोटुन गेला तरीही गाडी आली नाही तर येथे पहिल्या टप्प्यात काहीसा हरभरा वाटप करण्यात आला ,तर दुसऱ्या टप्प्यात मात्र शेतकरी चातक पक्षा प्रमाणे हरभरा बियानाची वाट बघत आहेत तर काही शेतकऱ्यांना परमिट सुद्धा वाटप करण्यात आले आहे त्यामुळे वेळ निघून गेल्यावर चना उपलब्ध होणार का? तर जमीनीचा ओलावा सुकु लागला आहे त्यामुळे त्वरीत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करीत शेकडो हरभरा उत्पादक शेतकऱयांनी जीप सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वामध्ये चक्क शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून कृषि अधिकारी यांच्या दालनात चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकानी हरभरा बियाणे मिळाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने कृषि प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती
या ठिय्या आंदोलनात जीप सदस्य गजानन बुटके , सुनील दाभेकर प्रमोद दांडेकर ,विवेक रामटेके वडशी, विनोद मेश्राम ,प्रकाश कुमरे,दिगंबर कामडी बालाजी कांमडी ,कांमडी,सुनील कडवे , रत्नताई सोनुने,बालाजी वाकडे,बकाराम वाकडे, यशवंत सावसाकडे, विकास वाकडे, मधुकर भोयर, देवनाथ रादये मदनापूर , पांडुरंग वाकडे, आकडू भोयर, घनश्याम धोंगडे, दिनकर चौधरी,आदी लाभार्थी शेतकरी उपस्थित होते
Body:१ )शेतकरी प्रल्हाद गायकवाड, रा. उसेगाव २ ) जिल्हा परीषद सदस्य गजानण बुटकेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.