ETV Bharat / state

अवैध प्रवासी वाहतूक पडली महागात, पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल - Case filed against reporter

चिमूर पोलीसांनी पोलीस स्टेशन हद्धीत आठवले सोशल वर्क कॉलेज शेडेगावजवळ महिंद्रा मॅक्सीको वाहनाने अकरा प्रवासी घेऊन जाताना पकडले. पोलिसांनी चालकाचे कृत्य, साथीचे रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक पडली महागात
अवैध प्रवासी वाहतूक पडली महागात
author img

By

Published : Apr 13, 2020, 9:25 AM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या वाहनातून प्रवाशांना घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. अशात चिमूर येथील एक व्यक्ती वरोरा, चिमूर मार्गे नागभिड येथे अवैधरित्या प्रवाशांना घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

यानुसार, चिमूर पोलीसांनी पोलीस स्टेशन हद्धीत आठवले सोशल वर्क कॉलेज शेडेगावजवळ महिंद्रा मॅक्सीको वाहनाने अकरा प्रवासी घेऊन जाताना पकडले. पोलिसांनी चालकाचे कृत्य, साथीचे रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. वाहन चालक एका पोर्टलचा प्रतिनिधी, पत्रकार आहे. त्याचे नाव विलास मारोती मोहीनकर असे असून तो नेताजी वार्ड चिमूर येथील रहिवासी आहे.

अनेक दिवसांपूर्वी नागभीड तालुक्यातील मांगरूळ येथील काही मजूर शेतमजूरीसाठी वरोरा तालुक्यातील बोडखा गावला गेले होते. कोरोना विषाणुमुळे जिल्ह्यातील सिमा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, 7 महिला व 4 पुरुष असे एकूण अकरा शेतमजूर वरोरा तालुक्यात अडकले होते. या शेतमजुरांना घेऊन एक खाजगी वाहन वरोरा -चिमूर मार्गे येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून शहरातील आठवले सोशल वर्क कॉलेज शेडेगावजवळ पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी चारचाकी वाहनासह वाहन चालक विलास मारोती मोहीनकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.