ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात ; 1 ठार तर 3 जण गंभीर जखमी

author img

By

Published : Jun 1, 2020, 2:47 PM IST

चिमूर तालुक्यामधील शंकरपुर गावाजवळील डोमा शिवरा फाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 5 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

चंद्रपूरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात
चंद्रपूरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात

चंद्रपूर - चिमूर तालुक्यामधील शंकरपुर गावाजवळील डोमा शिवरा फाट्यावर भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 5 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

चंद्रपूरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात ; 1 ठार तर 3 जण गंभीर जखमी

मृत महिलेचे नाव इंदिरा दडमल (वय-५०) असुन ती सिरसपूर येथील रहिवासी आहे. सिरसपूर येथील कैलास दडमल (वय ३०) स्वतःच्या दुचाकीने इंदिरा दडमल ,प्रीती नन्नावरे (वय २६) व पाच वर्षीय माही नन्नावरे यांना घेऊन मेंढेगाववरून सिरसरपूर येथे जाण्यासाठी निघाले होते.

शंकरपूर जवळील डोमा फाट्यावरून सिरसपूरकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेल्या चारही व्यक्ती खाली पडल्या. धडक जबरजस्त असल्याने इंदिरा यांच्या डोक्याला जबर मार लागला.

दरम्यान रुग्णालयात नेत असतानाच इंदिरा यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जणांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सह्हायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.