ETV Bharat / state

बदला घेण्सासाठी प्रेयसीवर अत्याचार करून बनवला व्हिडिओ, तिच्या वाढदिवशी टाकला सोशल मीडियावर - boyfriend physically abused his girlfriend

प्रेयसीचा बदला घेण्यासाठी आरोपीने तिच्यावर अत्याचार करत चक्क व्हिडिओ काढला. प्रेयसीच्या वाढदिवशी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकून आपण तिचा बदला घेत असल्याचे सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार बल्लारपूर येथे घडला आहे.

आरोपीला अटक
आरोपीला अटक
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:34 PM IST

Updated : Jun 7, 2021, 12:22 PM IST

चंद्रपूर : बदला घेण्यासाठी आरोपीने प्रेयसीवर अत्याचार करत चक्क व्हिडिओ बनवला. प्रेयसीच्या वाढदिवशी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकून आपण तिचा बदला घेत असल्याचे सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार बल्लारपूर येथे घडला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रेयसीचा बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल, बल्लारपुरातील धक्कादायक घटना

जंगलात नेऊन केला अत्याचार

आरोपी शण्मुखसिंग बुंदेल या 25 वर्षीय तरुणाचे 29 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडायला लागले होते. या दोघांत कडाक्याची भांडणे देखील व्हायची. याच दरम्यान आरोपी शण्मुखसिंग यांच्या मनात प्रेयसीचा सूड घेण्याचा विचार मनात डोकावू लागला. 27 मे रोजी त्याने माझ्यासोबत चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात चालण्याचा तगादा लावला. तो महाकाली मंदिरात घेऊन गेला. परत येत असताना त्याने प्रेयसीला जंगलात नेऊन मारहाण केली. तर 1 जूनला याचप्रकारे तिला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

आरोपीला अटक
आरोपीला अटक

प्रेयसीच्या वाढदिवशीच व्हिडिओ केला व्हायरल

हे सर्व चित्रीकरण त्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. यानंतर 3 जूनला तो प्रेयसीच्या घरी गेला. तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला. यावेळी तरुणीने त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. याचा राग मनात ठेवून प्रेयसीचा सूड उगविण्याचा निर्धार त्याने मनात केला. यातच 4 जूनला प्रेयसीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी आरोपी शन्मुखसिंग याने आशिष मल्होत्रा नावाच्या फेक फेसबुक आयडीवर अत्याचार केल्याचे दोन्ही व्हिडिओ अपलोड केले. 'धोकेबाज लोगों के साथ ऐसा ही होता है' असा टॅग त्याने त्यात लावला. ही गोष्ट प्रेयसीला कळताच तिने बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यादरम्यान आरोपीने हे व्हिडिओ डिलीट केले होते. पीडित फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी शन्मुखसिंग बुंदेल याच्याविरोधात अत्याचार, ॲट्रॉसिटी, अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहेत. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत आहेत.

हेही वाचा - BreakTheChain : राज्यात सरसकट शिथिलता नाही; स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवेल

Last Updated : Jun 7, 2021, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.