चंद्रपूर - कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. अशातच राज्यातील सर्व व्याघ्रप्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी घेतला आहे. त्यामुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्पदेखील येत्या 31 मार्चपर्यंत बंद असणार आहे. यादरम्यानच्या सर्व बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूने जगभर हातपाय पसरले आहेत. त्यामुळे याविषयी सर्व जगात एक दहशत निर्माण झाली आहे. याचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. त्यातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. त्यामूळे राज्यभरात याबाबत कमालीची सतर्कता बाळगली जात आहे. याचा फटका ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालादेखील बसला. अनेक देशीविदेशी पर्यटकांनी आपली बुकींग रद्द केली आहे. अशातही ताडोबा सुरू ठेवण्यात आले होते. येथे येणाऱ्या पर्यटकांची थर्मल चाचणी केली जाणार होती. मात्र, याच दरम्यान राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी राज्यातील सर्व व्याघ्रप्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य 18 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत ताडोब्यात झालेले बुकींग रद्द करण्यात आले असून पर्यटकांची रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक एन. प्रविण यांनी दिली आहे.
हेही वाचा -