चंद्रपूर - भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागभीड येथे सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उपस्थीत जनतेला संबोधीत करताना गडकरी यांनी काँग्रेसच्या अनेक धोरणांवर जोरदार टीका केली. या सभेला खासदार अशोक नेते, माजी आमदार मितेशजी भांगडीया तसेच इतर अनेक नेते उपस्थीत होते.
हेही वाचा... 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'
काँग्रेसच्या काळात पुढाऱयांचीच गरिबी हटली
काँग्रेसच्या काळात गरिबी हटावच्या फक्त घोषणा करण्यात आल्या होत्या. वास्तवात मात्र समाजातील कोणत्याही घटकांची गरीबी दूर झाली नसून जर गरिबी दूर झाली असेल तर ती काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांची झाली, असा जोरदार घणाघात नितीन गडकरींनी केला आहे. तसेच जे काम 60 वर्षांत झाली नाहीत ती कामे मागच्या 5 वर्षात भाजप सरकारने केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा... 'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते'
येत्या काळात बेरोजगारांसाठी नवनवे उद्योग उभारणार
नवनवीन सिंचन योजनांच्या माध्यमातून 40 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहेत. नवीन नद्या पुनर्जीवित केल्याने जलसंवर्धन होत आहे. तसेच शेती क्षेत्रात मूलगामी परिवर्तन केले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवन कसे सुधारेल याकडे आम्ही लक्ष घातले आहे. सिंचन, विहिरी, वीज पुरवठा साठी जोडण्या दिल्या आहेत. भविष्यात 11 कोटी बेरोजगारांना काम मिळणार आहे, त्यासाठी येत्या काळात बेरोजगारांसाठी नवनवे उद्योग उभारले जाणार आहेत.