चंद्रपूर - जागतिक किर्तीचे जेष्ठ पक्षितज्ञ डॉ सलिम अली आणि महाराष्ट्रतील पक्षीतज्ज्ञ अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांच्या जन्मादिनानिमित्त 5 नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो. पक्षी सप्ताहानिमित्त इको- प्रो संस्थेतर्फे जुनोना गावातील शालेय विद्यार्थ्यांकरता पक्षी निरीक्षणाचा व जुनोना तलाव परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात इको-प्रो जुनोना शाखेचे सदस्य सुध्दा सहभागी झाले होते.
सर्वप्रथम गावांतून पक्षांविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली, यातुन पक्षी संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. यानंतर सर्व विदयार्थ्यांनी जुनोना तलावाच्या काठाने फिरत पक्षि निरीक्षण केले. यावेळी इको-प्रो चे पक्षिमित्र तथा पक्षि संवर्धन विभाग प्रमुख बंडु दुधे, उपप्रमुख हरिश मेश्राम, विकील शेंडे यांनी पक्ष्यांची माहीती व ओळख करून दिली. यादरम्यान विदयाथ्यांना हरियल, राखी वटवटया, पिंगळा, कोकीळ, तांबट, शिंपी, महाभृगरांज, कोतवाल, बुलबुल, मैना, कवडी, पाणकावळा, वेडा राघु, खंडया, निलपंख, कुकु, पोपट, दयाळ, सातभाई, छोटा खाटिक, भुरा बगळा, गाय बगळा, आदी पक्षी पाहता आले.
यावेळी जुनोना तलाव काठावरील विदयाथ्यांकरता उपस्थीत पक्षीमित्रांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षीमित्र बंडु दुधे, हरीश मेश्राम यांचेसह सावित्रीबाई फुले विदयालयाचे शिक्षक विधाते सर, राउत सर, नागरकर सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जुनोना तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.