चंद्रपूर - केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकारला मागच्या ४७ वर्षांत जे जमले नाही, ते महायुती सरकारने मागच्या पाच वर्षात करून दाखवले. राज्याचा सर्वांगीण आणि संतुलित विकास करण्याचे काम भाजप सरकारने केले, असा दावा अर्थ, वने आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
हेही वाचा... गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण
होय आम्ही करून दाखवलं - मुनगंटीवार
'राज्यातील विरोधक केवळ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीच उरले नाही. मात्र पाच वर्षात महायुतीच्या सरकारने दमदार कामगिरी केली आहे. आरोग्य, शिक्षण, सिंचन, बांधकाम, रोजगार अशा सर्व क्षेत्रात या सरकारने भरीव काम केले आहे', असे मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी पाच वर्षात सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा यावेळी वाचला. आमच्या कामगिरी मुळेच आम्हाला विधानसभा निवडणुकीत जनता पून्हा निवडून देईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे