ETV Bharat / state

धम्मचक्र प्रवर्तन दिन; मारवाडी कुटुंबाने बौद्ध धम्माची घेतली दीक्षा, म्हणाले... - Buddhist Dhamma Diksha Chandrapur

जय बजाज यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. जय बजाज हे आधीपासूनच बंडखोरी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या लग्नासाठी जेव्हा समाजात मुली नव्हत्या तेव्हा एका मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी बजाज कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. याचा मोठा आघात जय बजाज यांच्यावर झाला. तेव्हापासून आपण आपल्या समाजात लग्न करणार नाही, असा प्रण त्यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी चंद्रपूर येथील बौद्ध समाजाच्या मुलीला मागणी घातली.

मारवाडी कुटुंबाने बौद्ध धम्माची घेतली दीक्षा

author img

By

Published : Oct 25, 2020, 8:37 PM IST

चंद्रपूर- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ म्हणजेच विजयादशमीला आपल्या लाखो अनुयायांसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. यामुळे नामशेष झालेल्या बौद्ध धम्माला नवसंजीवनी मिळाली आणि देशात बुद्धाचे विचार पुन्हा प्रस्थापित झाले. यातून बौद्ध धम्माचा प्रभाव अनेकांवर पडला. याच प्रभावातून बजाज कुटुंबाने माहेश्वरी समाजाचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

माहिती देताना जय बजाज

बुद्धाचा धम्म हा जातपात विरहित- जय बजाज

बुद्धाचा धम्म हा जातपात विरहित असून कुठलीही अंधश्रद्धा नसलेला आणि प्रज्ञा, शील करुणेचा धम्म आहे. त्यामुळे, आम्ही या धम्मात येऊन सुखी झालो, अशी प्रतिक्रिया जय बजाज यांनी दिली. जय बजाज यांचा जन्म माहेश्वरी म्हणजेच मारवाडी समाजात झाला. मूळचे पुसद येथील कुटुंबात जय बजाज यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. जय बजाज हे आधीपासूनच बंडखोरी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या लग्नासाठी जेव्हा समाजात मुली नव्हत्या तेव्हा एका मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी बजाज कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. याचा मोठा आघात जय बजाज यांच्यावर झाला. तेव्हापासून आपण आपल्या समाजात लग्न करणार नाही, असा प्रण त्यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी चंद्रपूर येथील बौद्ध समाजाच्या मुलीला मागणी घातली.

हळूहळू बौद्ध धम्माचा प्रभाव पडायला लागला

सासू सासऱ्यांनी देखील आक्षेप घेतला नाही. तेव्हापासून बजाज कुटुंबाचा सुखी संसार सुरू आहे. आज त्यांना दोन मुले आहेत. जय बजाज यांच्यावर हळूहळू बौद्ध धम्माचा प्रभाव पडायला लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध विचारसरणीची ते पुस्तके वाचायला लागले. त्याचा गाढा अभ्यास करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते बौद्ध धम्माकडे आकृष्ट झाले. बुद्धाचा विचार हा मानवतेचा विचार आहे, तिथे जातीपातीला थारा नाही. अंधश्रद्धेचे कर्मकांड नाही हे जेव्हा त्यांना समजले तेव्हापासून ते बौद्ध धम्माचे उपासक झाले. याची अधिकृत धम्मदीक्षा त्यांनी बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली १६ ऑक्टोबरला दीक्षाभूमी येथे घेतली.

निर्णय स्वतःच्या विवेकबुद्धीने घेतला

आपल्याला कुणीही असे करण्यासाठी बाध्य केले नाही. हा निर्णय आपण स्वतःच्या विवेकबुद्धीने घेतला आहे, असे जय बजाज म्हणतात. अन्य धर्मात प्रवेश केला तर तशी अनेक आमिषे आहेत. त्यात पैसा मिळतो, संपत्ती मिळते. मात्र, आपल्याला अशा कुठल्याही गोष्टीत रस नाही. बौद्ध धम्म हा मनाच्या श्रीमंतीचा धर्म आहे, असे ते म्हणतात. माझ्या आईवडिलांना देखील याचे दुःख नाही. उलट मी समाधानी आहे याचा त्यांना आनंद आहे, असे ते सांगतात.

माहेश्वरी समाजाने देखील केले स्वागत

जय बजाज यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याची माहिती माहेश्वरी समाजाला मिळाली. त्यानुसार समाजाच्या बैठकीत त्यांना बोलावून विचारणा करण्यात आली. यावेळी जय बजाज यांनी आपला पक्ष ठेवताना यावर स्पष्टीकरण दिले. आपण जातीभेद करतो. मात्र, आज एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असली तर ती घेताना आपण त्याची जात विचारत नाही. पाळीव प्राणी पाळताना त्याची जात वगैरे काही नसते. घरी दूध घेताना आपण बघत नाही की ती गाय किंवा म्हैस कुठल्या जातीची आहे. मग एवढे सगळे आहे तर मग मी जातीपातीच्या पलीकडे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तर यात वावगे काय ? असा प्रश्न केला. यावर उपस्थितांनी उत्तर हे टाळ्या वाजवून दिले. कारण हे सांगत असताना आपल्या मनात प्रेम, करुणा आणि आदर होता, असे जय बजाज सांगतात.

हेही वाचा- आरटी-1 वाघ पिंजऱ्यातुन पळाला; वनविभागाची डोकेदुखी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.