ETV Bharat / state

चंद्रपूर : घुग्घुस येथे 65 वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

author img

By

Published : Jun 4, 2021, 8:08 PM IST

पहाटे शौचास गेली असता 65 वर्षीय महिलेवर एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

chandrapur crime news
चंद्रपूर : घुग्घुस येथे 65 वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

चंद्रपूर - घुग्घुस येथील 65 वर्षीय महिला पहाटे शौचास गेली असता तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोहम्मद यासिन (22) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अटकेत -

पीडित महिला घुग्घुस येथे शांतीनगर येथील रहिवासी आहे. ही महिला आपला पती, मुलगा आणि सुनेसोबत राहते. आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुरमारास ही महिला आपल्या घरामागे शौचास गेली असता मोहम्मद यासिन या आरोपीने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. याप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरोधात भादवी कलम 354 (अ), 376, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - अभिनेत्री जुही चावलाची 5जी विरोधातील याचिका फेटाळली; ठोठावला 20 लाखांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.