चंद्रपूर - बार्टी ( BARTI ) च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थी शासकीय सेवेत रुजू होण्याच्या ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) सरासरीवरून पुढे हे केंद्र चालवायला परवानगी द्यायची की नाही हे ठरवले जाते. चंद्रपूर बार्टी केंद्रातून तब्बल 159 विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी ( government service ) लागल्याचा दावा संचालिका अनुपमा बुजाडे यांच्याकडून करण्यात आला होता.
बार्टी केंद्रातून पत्रक काढून प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक काढून प्रसार माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, ही यादीच बोगस ( Allegations About Barti's list ) असून यात खोटी नावे आणि मोबाइल क्रमांक टाकून दिशाभूल केली जात असल्याची विश्वसनीय माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. असे करून बार्टीच्या वरीष्ठ व्यवस्थापनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
चौकशी टाळण्यासाठी केलेला प्रयत्न अनुपमा बुजाडे यांच्या युक्ती मल्टिपर्पज सोसायटीकडे ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) चंद्रपूर आणि नागपूर अशी दोन बार्टीची केंद्रे आहेत. अनेक कारणांमुळे हे दोन्ही केंद्र वादग्रस्त ठरले आहेत. या केंद्रात मोठा आर्थिक घोळ केला जातो, असा आरोप होतो आहे. चंद्रपूर केंद्रातील काही विद्यार्थ्यांचे मानधन त्यांना अनुपस्थित दाखवून थांबविण्यात आले. नागपुरात या केंद्रात चालणाऱ्या आर्थिक घोळाबाबत ( Allegations About Barti's list ) तक्रारी आल्याने संस्थेची झालेल्या बदनामीला पांघरूण घालण्यासाठी या केंद्राकडून पब्लिसिटी स्टंट करण्यात आला. युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या ( government service ) माध्यमातून 890 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतले यापैकी तब्बल 159 जणांना शासकीय निमशासकीय विभागात नोकरी लागण्याचा दावा करण्यात आला. यानुसार प्रत्येक सहा विद्यार्थ्यामागे एकाला शासकीय विभागात नोकरी लागली असल्याचे सिद्ध ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) होते. हे प्रमाण अनन्यसाधारण आहे. एका चमत्कारापेक्षा ही बाब कमी नाही. असे असल्यास बार्टी संस्थेकडून या केंद्राचा सत्कार करायला हवा तसेच येथील शिकवणी पद्धतीचा अभ्यास करून 'महाराष्ट्र मॉडेल' राबवायला हवा. मात्र ही केवळ धूळफेक असून चौकशी टाळण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
संचालिकेचा आधी होकार, मग नकार बार्टी केंद्रातून 159 प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय-निमशासकीय सेवेत नोकरी मिळाल्याचा दावा प्रसिध्दीपत्रक काढून करण्यात आला. याबाबत बार्टी केंद्राच्या ( government service ) संचालिका अनुपमा बुजाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही यादी देण्यास होकार दिला, मात्र, ह्या विद्यार्थ्यांची नावे काय आहे, ते कुठल्या विभागातील कुठल्या पदावर रुजू झाले, त्यांचे नियुक्तीपत्र याची माहिती विचारताच त्यांनी गोपनीयतेचे कारण समोर करत नकार दिला. कारण हा दावाच बोगस ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) आहे. जे कधीही नोकरीवर लागलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांची नावे यात टाकण्यात आली आहेत. हे बिंग फुटू नये, त्यांच्याशी संपर्क होऊ नये म्हणून त्यांचे बोगस नंबर टाकण्यात आले. वास्तविक हे नंबर कधीही त्यांचे नव्हते. या विद्यार्थ्यांचे नियुक्तीपत्र त्यांच्याकडे नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे.
बार्टीच्या महासंचालकाची अप्रत्यक्ष पाठराखण युक्ती मल्टिपर्पज सोसायटीच्या बार्टीच्या केंद्रातील घोळ ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) आणि गैरव्यवहाराबाबत ईटीव्ही भारतने सातत्याने पाठपुरावा केला. ही बाब बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांना महिती आहे. त्यांनी चौकशी करण्याचे थातुरमातुर आश्वासन दिले, मात्र नंतर त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या केंद्राला पाठीशी घालण्यात नेमका कुठला 'लाभ' होतो आहे हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे बार्टीच्या केंद्रातून ( government service ) स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेऊन किती विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होतात, या निकषांवर त्यांना पुढे सुरू ठेवायचे की नाही हा निर्णय घेतला जातो. मात्र याची कुठलीही शहानिशा बार्टीकडून केली जात नाही. या 159 जणांची कुठलीही शहानिशा बार्टीच्या वरीष्ठ व्यवस्थापणाने केलेली नाही. शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांकडून नियुक्तीपत्र ( Barti's list of 159 people to join government service are bogus ) घेणे गरजेचे आहे. मात्र असे नियुक्तीपत्र चंद्रपूर केंद्रातून पाठविण्यात आले नाही. म्हणून एका स्वतंत्र समितीकडून याची सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.