ETV Bharat / state

'करंजीचा सुपुत्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी' वडेट्टीवारांच्या वर्गमित्रांनी दिल्या शुभेच्छा - Vijay Vadettiwar took oath as cabinet minister

गावचा सुपुत्र आणि वर्गमित्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदावर नियुक्त झाल्याचा आनंद करंजीवासियांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळात राहून विजुभाऊ गावासाठी, तालुक्यासाठी खुप काही करतील, असेही त्यांच्या वर्गमित्रांनी सांगितले.

karanji villagers celebrate Vijay Wadettiwar oath ceremony
विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव करंजी
author img

By

Published : Dec 30, 2019, 9:15 PM IST

चंद्रपूर - काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सोमवारी शपथ घेतली. त्यांचा हा शपथविधी सोहळा गोंडपिपरी तालूक्यातील करंजी गावासाठी विशेष ठरला आहे. कारण गावच्या मातीत वाढलेला, आपल्या सोबत खेळलेला, शिकलेला माणुस मोठा झाला आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला, याचा आनंद वाटत असल्याचे विजय वडेट्टीवार यांच्या वर्गमित्रांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या वर्गमित्रांनी दिल्या शुभेच्छा

हेही वाचा... अजितदादांचा 'हा' विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातीळ गोंडपिपरी तालूक्यातील करंजी या गावचे सुपुत्र आहेत. आपल्या गावचा माणुस मंत्री झाला. गावाचे भुमिपुत्र असल्याने वडेट्टीवार यांचा शपथविधी सोहळा करंजी गावासाठी आनंदोत्सव ठरला. यावेळी वडेट्टीवारांच्या शालेय मित्रांनी त्यांच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा... बाबांचे आशिर्वाद नेहमीच सोबत म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो - अमित देशमुख

आमदार विजय वडेट्टीवार हे मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे आहे. करंजी या गावीच त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झाले. गोंडपिपरीतील जनता विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील करंजीचे सरपंच होते. मात्र, पुढे त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. या दरम्यानच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. बालपणापासूनच काहीतरी स्वताःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द वडेट्टीवार यांच्या मनात होती, असे येथील गावकरी सांगतात.

हेही वाचा... राज्यपाल कोश्यारी के. सी. पाडवींवर संतापले, आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

वडेट्टीवार यांनी काही दिवसांनी कुटुंबियासह करंजी गाव सोडले. अन् गडचिरोली शहर गाठले. त्यानंतर एक एक टप्पा गाठत ते आमदार झाले. पुढे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एक आक्रमक नेता, अशी त्यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली. पुढे पक्षाने त्यांना उपगट नेतेपद दिले. सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा माणुस, अशी ओळख वडेट्टीवार यांची ओळख असल्याचे त्यांचे वर्गमित्र सांगतात.

हेही वाचा... भरणेंना मंत्रीपद देऊन अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना धक्का

विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि करंजी गावात जल्लोष सूरु झाला. आपल्या गावातील माणुस मंत्री झाला, याचा आनंद सर्व गावाकऱ्यांमध्ये दिसत होता. करंजीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिक्षण घेतलेले त्यांचे अनेक सवंगडी आहेत. त्यांनी आजही या मित्रांसोबत आपुलकीचे संबंध जपले आहेत.

Intro:करंजीतील भुमिपुञ झाला महाराष्ट्राचा कॕबिनेट मंत्री

चंद्रपूर

आपल्या सोबत खेळलेला,शिकलेला माणुस मोठा झाला. आज त्याने महाराष्ट्र राज्याचा कॕबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथ ग्रहण सोहळा गोंडपिपरी तालूक्यातील करंजी गावासाठी विशेष सोहळा ठरला आहे. या गावाचा मातीत रांगलेला विजय वड्डेटीवार नावाचा माणुस मंत्री झाला. करंजी गावाचे भुमिपुत्र असलेल्या वड्डेटीवार यांच्या शपथ ग्रहण सोहळा करंजी गावासाठी आनंदोत्सव ठरला आहे. वड्डेटीवारांचे शालेय मित्रांनी जून्या आठवणींना उजाळा दिला.

आमदार विजय वडेट्टीवार यांचे विधानसभेतील काँग्रेसच्या कॕबिनेट मंत्रीपदावर निवड झाली. वडेट्टीवार मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे आहे .त्यांना मिळालेल्या पदाने तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे .करंजी येथेच त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झाले .गोंडपिपरीच्या जनता विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. वडील करंजीचे सरपंच होते. अचानकपणे त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले .दरम्यानच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. बालपणापासूनच काहीतरी स्वताची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द त्यांचा मनात होती . त्यांनी कुटुंबियासह करंजी गाव सोडले. अन गडचिरोली शहर गाठले .त्यानंतर ते आमदार झाले .वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एक आक्रमक नेता अशी ओळख त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. पक्षाने त्यांना उपगट नेतेपद दिले. सर्वसामान्यासाठी धावून जाणारा माणुस अशी ओळख वड्डेटीवार यांची आहे. राजकारणातील चानाक्ष्य व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांना ओळखले जाते. विजय वड्डेटीवार यांनी मंत्रीपदाची शपथ ग्रहण केली अन करंजी गावात जल्लोष सूरु झाला. आपल्या गावातील माणुस मंत्री झाला याचा आनंद गावकर्यात दिसून आला. करंजीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिक्षण घेतलेले अनेक सवंगडी आहेत .त्यांचे आजही या मित्रासोबत आपुलकीचे संबंध आहे .आजही त्यांची गावाशी नाळ जूळलेली आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.