ETV Bharat / state

तब्बल ४४ वर्षानंतर अंध डोळ्याने लागले दिसायला; डॉ. बावनकर यांची किमया - चिमूर येथील नेत्र तज्ञ डॉ प्रितम बावनकर

वैद्यकशास्त्राच्या नव नविन संशोधनाने अनेक असाध्य व्याधीपासुन मुक्ती मिळत आहे. चिमूर तालुक्यातील मासळ येथील वृद्धाच्या डोळ्याला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच मोतीया बिंदुने अंधत्व आले, त्यापैकी एका डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

lalita
ललीता कारूजी मेश्राम
author img

By

Published : Apr 28, 2022, 4:40 PM IST

Updated : Apr 28, 2022, 8:28 PM IST

चिमूर (चंद्रपूर) - वैद्यकशास्त्राच्या नव नविन संशोधनाने अनेक असाध्य व्याधीपासुन मुक्ती मिळत आहे. चिमूर तालुक्यातील मासळ येथील वृद्धाच्या डोळ्याला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच मोतीया बिंदुने अंधत्व आले, त्यापैकी एका डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उजवा डोळा तसाच राहीला. या अधु डोळ्यावर चिमूर येथील डॉ. प्रितम बावनकर यांनी केलेल्या मोतीबिंदुच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रियेने किमया केली आणि तब्बल ४४ वर्षानंतर अधु डोळ्याला दिसायला लागले आहे.

प्रतिक्रिया देताना डॉक्टर आणि रुग्ण

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील ललीता कारूजी मेश्राम यांचे वयाच्या सोळाव्या वर्षी चिमूर तालुक्यातील मासळ येथील कृष्णदास खापर्डेंसोबत लग्न झाले. अवघ्या वयाच्या १७ व्या वर्षीच डाव्या व उजव्या डोळ्याची दृष्टि अंधुक झाली. मांत्रिक बुवाबाबाकडे सासरच्यांनी नेले. मात्र, परीणाम झाला माही. त्यानंतर शासकिय रुग्णालयात उपचार घेण्यात आला. दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळेला शस्त्रक्रिया करून भिंग बसविण्याचे तंत्र भारतात विकसीत व्हायचेच होते. ज्यामुळे डाव्या डोळ्याला दिसायला लागले. मात्र, उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया साध्य झाली नाही व यामुळे उजवा डोळा अधु झाला.

डॉक्टरांची किमया - चिमूर येथील नेत्र तज्ञ डॉ. प्रितम बावनकर यांच्याकडे मागील महिन्यात तपासणी केली. डॉक्टरांनी मोतीबिंदुमुळे आत रेटिण्यात गुंतागुंत वाढली त्यावर शस्त्रक्रिया केल्यास अधु झालेल्या उजव्या डोळ्याची दृष्टि परत येऊ शकते असे.सांगितले. ललीता बाईच्या कुटूंबामध्ये अशा पल्लवित झाली आणि त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेऊन शस्त्रक्रियेस मंजुरी दिली. डॉ. बावनकरणी अल्फाम रेजिऑन या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. डॉक्टराच्या हाताला गुण येऊन किमया झाली आणि तब्बल ४४ वर्षांनंतर अधु झालेल्या उजव्या डोळ्यात तेज येऊन दिसायला लागले. ज्यामुळे ललीताबाईच्या जीवणात प्रकाश मिळाला. काही दिवसानी दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया करुण ललीताबाईस खऱ्या अर्थाने डोळस बनवण्यात येईल.

Last Updated : Apr 28, 2022, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.