ETV Bharat / state

रामाळा तलावाच्या बचावाकरिता प्रशासनाकडून मागण्या मान्य; 12 दिवसांनी सुटले उपोषण - इको प्रो संस्था अध्यक्ष बंडू धोत्रे न्यूज

प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसिलदार निलेश गोंड यांच्याहस्ते इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबू-पाणी पाजल्यानंतर धोत्रे यांचे उपोषण १२ दिवसांनी सुटले.

Eco pro hunger strike
12 दिवसांनी सुटले उपोषण
author img

By

Published : Mar 6, 2021, 3:23 PM IST

Updated : Mar 6, 2021, 5:29 PM IST

चंद्रपूर - रामाळा तलावाच्या रक्षणार्थ इको प्रो ने केलेल्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी २२ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन आज सुटले आहे.

प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसिलदार निलेश गोंड यांच्याहस्ते इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबू-पाणी पाजल्यानंतर धोत्रे यांचे उपोषण १२ दिवसांनी सुटले.

लिंबू-पाणी पाजल्यानंतर धोत्रे यांचे उपोषण १२ दिवसांनी सुटले

हेही वाचा-अनोळखी युवतीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला; गुन्हा दाखल

आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याकरिता पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव सरकारला येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरण करण्याकरीता दोन टप्यात कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली.

हेही वाचा-सचिन वझेंच्या नियुक्तीवर मनसेकडून संशय

खोलीकरणासाठी पाठपुरावा
रामाळा तलाव खोलीकरण बाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना दिनांक 5 मार्चला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खोलीकरणाबाबत पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव भारतीय पुरातत्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून तातडीने मंजुर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी मंजुरी
रामाळा तलावात होणाऱ्या सांडपाण्याच्या विसर्जनावर उपाय म्हणून महानगरपालिका चंद्रपूर यांच्याकडून सांडपाणी प्रकल्प सयंत्र व रिटेनिंग वॉलबाबत प्रस्ताव तयार करून पर्यटन विभागाला सादर करण्यात येत असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. रामाळा तलाव येथील मच्छी नालामधील पाणी झरपट नदी यथे वळविण्याकरीता नाला बांधकाम असे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव हे 5 मार्चला व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना सादर करण्यात आले आहेत. फ्रुट ओव्हर ब्रिज बांधकामाकरिता 4 कोटी 49 लाख अंदाजपत्रकास सरकारकडून मान्यता मिळालेली होती. 1 कोटी 7 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्राप्त झाले आहेत. या कामावरील खर्चात वाढ झालेली असल्याने वाढीव अंदाजपत्रकास मान्यता घेण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. रामाळा तलावाच्या कामाकरीता जिल्हा खनिज निधीमधून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचे अध्यक्ष पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेशी चर्चा झाली आहे. जिल्हा खनिज विकास निधी व अन्य मार्गातून निधी उपलब्ध करुन देणेबाबत आश्वासन तहसिलदार निलेश गोंड यांना देण्यात आले.

महानगरपालिकन रामाळा तलावात येणारे सांडपाणी विषयक काम प्राधान्याने करणेबाबत महानगरपालिकेला सूचना दण्यात आल्या आहेत. आदी मागण्या मान्य करून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पत्र बंडू धोत्रे यांना देण्यात आले आहे. ईको प्रोचे अध्यक्ष बंडु धोत्रे यांनी एकमेव तलावाचे जतन करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

Last Updated : Mar 6, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.