ETV Bharat / state

खाद्यतेलाच्या कंटेनरचा अपघात; तेलाची लूट करण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा - चंद्रपूर कंटेनर अपघात बातमी

सोमवारी दुपारच्या सुमारास खाद्यतेल भरलेला एक कंटेनर नागपूरकडे जात होता. मोहाडी या गावाजवळ या कंटेनरचा अपघात घडला. यावेळी खाद्यतेल मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.

कंटेनरचा अपघात
author img

By

Published : Aug 20, 2019, 4:20 AM IST

चंद्रपूर- खाद्यतेल घेऊन जाणारे एक कंटेनर नागभीड मार्गे नागपूरला जात होते. यावेळी कंटेनरचा अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात तेलाची गळती झाली. गळती होणारे खाद्यतेल मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या घटनेचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खाद्यतेलाच्या कंटेनरचा अपघात

सोमवारी दुपारच्या सुमारास खाद्यतेल भरलेला एक कंटेनर नागपूरकडे जात होता. मोहाडी या गावाजवळ या कंटेनरचा अपघात घडला. एका टिप्परने या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली होती. त्यामुळे कंटेनरमधून खाद्यतेलाची गळती सुरू झाली. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी सरळ या कंटेनरच्या दिशेने कूच केली. अनेकांनी खाद्यतेल नेण्यासाठी जे जे साहित्य असेल त्यात ते भरून घेतले. बघता बघता येथे तेलासाठी नागरिकांची झुंबड उडाली. बादल्या, डबे जे मिळाले त्यात हे तेल टाकण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

Intro:चंद्रपुर : नागभीड मार्गे नागपुरला खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात घडला. तेलाची गळती झाली. मग काय, नागरिकांच्या रांगा लागल्या. ज्यांना जसे जमले तसं तेल ते घेऊन गेले. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

आज दुपारच्या सुमारास एक खाद्यतेल भरलेला कंटेनर नागपूरकडे जात होता. मोहाडी या गावाजवळ या कंटेनरचा अपघात घडला. एका टिप्परने या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे मागून खाद्यतेलाची गळती सुरू झाली. चालकाला किरकोळ जखम झाली. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. मग काय जे व्हायचं तेच झालं. नागरिकांनी सरळ या कंटेनरच्या दिशेने कूच केली. अनेकांनी आपल्याजवळ खाद्यतेल नेण्यासाठी जेजे साहित्य असेल त्यात ते भरून घेतले. बघता बघता येथे तेलासाठी नागरिकांची झुंबड उडाली. बादल्या, डबे जे मिळाले त्यात हे तेल टाकण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.