ETV Bharat / state

चंद्रपूर : बामनी प्रोटिन फॅक्टरीत अपघात; एकाचा मृत्यू, तीन कामगार गंभीर - Bamni Protein Factory

जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहर परिसरात बामणी प्रोटिन फॅक्टरीमध्ये झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तीन कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ही घटना घडली.

Bamni Protein Factory Accident
बामणी प्रोटीन फॅक्टरीमध्ये अपघात
author img

By

Published : Oct 30, 2020, 7:45 PM IST

Updated : Oct 30, 2020, 8:51 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहर परिसरात बामणी प्रोटिन फॅक्टरीमध्ये झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला तर, तीन कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ही घटना घडली.

फॅक्टरीतील रिकाम्या टाकीची सफाई करण्यासाठी विशाल माऊलीकर हे टाकीत उतरले. ही टाकी तब्बल 30 फूट खोल होती. ते खाली उतरताच काही वेळात बेशुद्ध झाले. बराचवेळ होऊन देखील माऊलीकर वर येत नसल्याने काय घडले हे पाहण्यासाठी आणखी तीन कामगार टाकीत उतरले, ते देखील बेशुद्ध झाले. मात्र घडलेला प्रकार तिथे हजर असलेल्या अन्य कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी या तिघांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नेत सतांना विशाल माऊलीकर यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर अन्य तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. बंडू निवलकर, शैलेश गावंडे आणि मनोज मडावी अशी त्यांची नावे आहेत.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अपष्ट आहे, तसेच फॅक्टरी प्रशासनाच्यावतीने देखील याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही. मृत आणि प्रकृती गंभीर असलेल्या कामगारांना कंपनी प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून होत आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.